कंधार -ता. प्र. – ७/११/२०२२ कंधार – शिवसेना ही समाजकारणावर चालणारी संघटना आहे.शिवसेनाप्रमुखाच्या विचाराशी समरस होण्यासाठी गाव तिथे शाखा अन घर तिथे शिवसैनिक अशी उक्ती अवलंबण्यात यावी.जो पर्यंत शिवसेनाप्रमुखाचे विचार घराघरात पोहोचले तरच शिवसेना मजबूत होईल असे प्रतिपादन हिंगोली – नांदेड संपर्कप्रमुख बबनराव थोरात कंधार येथील आढावा बैठकीत बोलताना केले.
कै. वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक हिंगोली-नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात तर प्रमुख उपस्थितीत माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार रोहिदास चव्हाण,शिवसेना नेते अॅड. मुक्तेश्वरभाऊ धोंडगे, बाळू पाटील कराळे,नांदेड जिल्हा सहसंपर्कप्रमुख भुजंग दादा पाटील,सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार,सहसंपर्कप्रमुख मनोज भंडारी, जिल्हाप्रमुख दता पाटील कोकाटे,महिला आघाडीच्या जिल्हासंघटक वच्छलाताई मारोतराव पुयड,उपजिल्हासंघटक वर्षाताई गणेश कुंटेवार, युवासेना जिल्हा सचिव माधव पाटील पावडे,उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कराळे,लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,कंधार तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल,नेताजी भोसले, बाळासाहेब देशमुख,पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण,नवनाथ बापु चव्हाण,भिमराव जायभाये, तालुकायुवा अधिकारी सचिन जाधव, आनंद राठोड, निरंजन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यानंतर मार्गदर्शन भाषणात बोलताना संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या जोमाने सुरू असलेली घोडदौड मशाल निशाणीची सुरू आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे एक विचार घेऊन चालणारी संघटना आहे.खोके घेऊन पक्षाची वाताहत करण्याचे मनसुबे करणाऱ्या गद्दारांना ठेचून काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मशाल ही निशाणीने आपली गद्दारांना शिक्षा देण्याची ताकद दाखवायची आहे.आज पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आहेत याचा आपणास अभिमान वाटतो.उध्दवजीनी ज्यांना ज्यांना मोठ केल. ते त्यांच्या वर पलटले पण तुमच्या सारखा तळागाळातील शिवसैनिक उध्दवजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.अंधेरीचा निकाल हा शिवसेनेच्या मशालीचा आहे.आज उध्दवजीना आपली गरज आहे त्यांना आता गेलेली सता शिवसैनिकास मुख्यमंत्री बनवून परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.आज शिवसेनाप्रमुखाचे विचाराची गरज आहे. त्यांचे विचार जागविण्यासाठी गाव तिथे शाखा अन घर तिथे शिवसैनिक झाले पाहिजे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकविण्याची शपथ घ्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश कुंटेवार तर प्रास्ताविक परमेश्वर पाटील जाधव यांनी व्यक्त केले.