कंधार ; मन्याड-गोदा खोर्यातील रक्षाबंधन सणानिमित दरवर्षी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व सर्व टिमच्या वतीने गेली नऊ वर्षांपासून अखंडीत रक्षाबंधनाच्या स्फूर्तिदायक उपक्रमातून कंधार-लोहा तालुक्यातीलच ज्ञानालय नव्हे तर नंदीग्राम नगरीतील शाकुंतल एक्सलन्स ज्ञानालयाने सहभाग नोंदवून भारतीय शूर सैनिकांना ३३३३ सदिच्छा संदेश व राख्या अन् सोबत १५ फुटाची महाराखी या वर्षीही कंधार पोलिस स्टेशन येथे कार्यक्रम घेऊन भारतीय डाक सेवेमार्फत पाठवित असते.२६२ फिल्ड रेजिमेंटचे प्रमुख कुमार चंदनकुमार ,सुभेदार मेजर अमरसिंह साहू ,हवालदार शिवहर कागणे भोजुचीवाडीकर यांच्या पुढाकाराने ही शालेय रसद पाठवितात.यंदाही त्यांनी शालेय चिमुकल्या भगीनींना लेखनी भेट स्वरुपात हवालदार शिवहर कागणे भोजुचीवाडीकर यांच्या हस्ते पाठवले.
या शैक्षणिक भेटीचे विमोचन पंचायत समिती कंधारचे गटशिक्षण अधिकारी बालाजीराव शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षण अधिकारी बालाजी शिदे यांनी भुषविले.प्रमुख पाहूणे म्हणून माजी सैनिक जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड, शासकीय गुत्तेदार व सामाजिक कार्यकर्ते वैजनाथराव सादलापूरे,महिला प्रतिनिधी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका प्रेमलाताई नरंगले,विद्या विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजहंस शहापूरे ,लातूरचे क्ष-किरण अधिकारी गोविंदराव बिडवई, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुनराव कांबळे, भारतीय सैनिक २६२ रेजिमेंटचे हवालदार शिवहर कागणे त्यांचे वडील सुदाम विठ्ठलराव कागणे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मीर्झा जमीरबेग-दैनिक लोकमत समाचार,विश्वंभरराव बसवंते पत्रकार-दैनिक एकमत,दैनिक चालु वार्ताचे पत्रकार माधव गोटमवाड,संगणक तज्ञ गीते तरुण सामाजिक कार्यकर्ते मुन्ना खाडे सहित अनेक देशप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कंधारी परंपरेनुसार वंदेमातरम हे राष्ट्रीय गीत गायन करुन भारत मातेचे रक्षण करत सीमेवर धारातीर्थी पडलेल्या वीर शहीदांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुंदर अक्षर कार्यशाळेच सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर ग्रंथपाल श्री शिवाजी हायस्कूल कंधार यांनी प्रस्ताविकेत मन्याड खोर्यातील रक्षाबंधनाच्या स्फूर्तिदायकचा इतिहास सांगुन हे माझ्या एकट्याचे श्रेय नसुन संपूर्ण देशभक्त नागरीकांचा व सर्व टिमला श्रेय जाते.हा उपक्रम जीवनाच्या शेवटच्या श्वासा पर्यंत सुरुच ठेवणार आहे प्रतिपादन केले.
महिला प्रतिनिधी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका प्रेमलाताई नरंगले यांनी गीतातून भारतीय सैनिकाप्रति संवेदना व्यक्त करतांना गीतातून आभार व्यक्त करुन उपक्रमकार सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे व सुलेखनकार दत्तात्रय एमेकर यांचे कौतुक केले.
माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी रक्षाबंधन सणानिमित राबविण्यात येणारा कार्यक्रम फक्त वर्तमानपत्रातून वाचलो होतो.पण आता प्रत्यक्ष उपक्रमात दोन वर्षापासून सहभागी होता येत आहे.शिक्षकांनी सैनिकांना घडवले आहे. याचे समाधान मिळते आहे.असे गौरवोद्गार मनोगत व्यक्त करतांना बोलून दाखवले.
हवालदार शिवहर कागणे भोजुचीवाडीकर यांनी राख्या पोहंचल्यानंतर भारतीय सैनिक बांधवाना परिवारा सोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा आनंद मिळतो.दरवर्षीच राखी पाठविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे समाधान मिळते असे सांगितले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे बोलतांना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींची आठवण करत जय जवान! जय किसान उल्लेख करत मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमाचे तोंडभर कौतुक केले.भारतीय वीर सैनिकांना घडविणारे शिक्षक आहेत. हे उद्गार बालाजीराव चुकलवाड यांचे ऐकताच माझ्या अंगावर वीररस संचारला असे प्रतिपादन करत दिव्यांग दत्तात्रय एमेकर यांचे कौतुक करतांना म्हणाले.दत्तात्रय एमेकर हे शरीराने अपंग पण मनाने अभंग आहेत.माझ्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले .
आभार मुख्याध्यापक राजहंस शहापुरे यांनी मानले तर उत्कृष्ट सुत्रसंचलन दिगांबर वाघमारे यांनी केले.चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
(कार्यक्रमांचे क्षणचित्रे )