उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने माधव भालेराव सन्मानित

कंधार/प्रतिनिधी

शिवा अखिल भारतीय वीरसेव युवक संघटनेच्या वतीने गेल्या २७ वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.संघटनेच्या पुरस्कारात राज्यातील दोन उत्कृष्ट पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो.पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार हिंदवी बाणाचे संपादक माधव भालेराव यांना जाहीर करण्यात आला होता.०७ नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे पालकमंत्री अतुल साळे व शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माधव भालेराव यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

शिवा संघटनेच्या वतीने गेल्या २७ वर्षापासून कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे राज्यव्यापी मेळावा घेण्यात येतो. मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यामध्ये पत्रकारांचाही समावेश आहे.२०२२ च्या पुरस्कारामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन पत्रकारांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये कंधार येथील हिंदवी बाणा चे संपादक माधव भालेराव व पुण्यनगरीचे उपसंपादक कैलास लवंगडे यांना पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.०७ नोव्हेंबर रोजी कपिलधार येथे शिवा संघटनेचा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यास राज्यातील अनेक संत मंहत व शिवाचार्य उपस्थित होते.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अतुल साळे यांच्या हस्ते माधव भालेराव यांना पत्रकारिता उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले.

 

 

प्रा.मनोहर धोंडे व पालकमंत्री अतुल साळे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली या पूजेनंतर शिवा मैदानावर शिवा संघटनेचा २७ वा मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला अतुल साळेसह अनेक संत मंहत उपस्थित होते.

कपिलधारच्या विकासासाठी शंभर कोटीचा आराखडा मनोहर धोंडे यांनी शासनाकडे पाठवला.यावेळी मेळाव्यात मार्गदर्शन करताना अतुल साळे म्हणाले की एखाद्या संघटनेत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते ही गौरवशाली बाब आहे.कपिलधारीच्या यात्रेसाठी शिवा संघटनेच्या काही मागण्या केल्यात त्या मागण्या पालकमंत्री म्हणून शासन दरबारी मांडून या परिसराचा विकास करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.माधव भालेराव यांना पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पालकमंत्री अतुल साळे यांनी अभिनंदन केले तर तर कंधार लोहा नांदेड येथूनही अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *