नांदेड;
शुक्रवार 28 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 168 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 215 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 164 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 114 अहवालापैकी 846 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 5 हजार 855 एवढी झाली असून यातील 4 हजार 62 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
\
एकुण 1 हजार 543 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 164 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 27 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे वासरी येथील 49 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे पानभोसीरोड कंधार येथील 42 वर्षाचा पुरुष, हुनगुंदा ता. बिलोली येथील 45 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे कुरुळा ता. कंधार येथील 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे लोकमित्रनगर नांदेड येथील 88 वर्षाचा पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 12, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 7, देगलूर कोविड केअर सेंटर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 70, लोहा कोविड केअर सेंटर 7, माहूर कोविड केअर सेंटर 1, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयातील 6 असे एकूण 168 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.