मैत्री म्हणजे..!

मैत्री म्हणजे…!
    मैत्री”हा शब्द अनेक अर्थाचे पैलू ऊलगडतो,मैत्री म्हणजे हळव्या नात्याचा ऋणानुबंध.मैत्री म्हणजे मन मोकळ करण्याची हक्काची आणि विश्वासाची जागा.मैत्री एक निस्वार्थि नात,एकमेकात गुंतलेल…मैत्रीच्या पंखावर अलगद जपलेल.

          मैत्र जीवाचे…प्रीत फुलांचे,मैत्री पावित्र्याचा अविष्कार…मैत्री धुंद मनातला मूक होणार…मैत्री म्हणजे अनमोल भक्तीभाव…मैत्री म्हणजे जगण्याच सामर्थ्य…मैत्रीत नसावा स्वार्थ…मैत्री म्हणजे आयुष्याचे इंद्रधनूष्यी रंग…मैत्रीचे नाते म्हणजे श्वास आणि आयूष्याचे…समूद्र आणि लाटांचे,मैत्री म्हणजे दोन मनाला जोडणारा धागा,मैत्री म्हणजे चैतना,मैत्री म्हणजे उल्हास,मैत्री म्हणजे त्याग,मैत्री म्हणजे विश्वास,मैत्री म्हणजे सूखद क्षणांची बरसात.मैत्रीत असते एकमेकांसाठी जगण्याची आस.मैत्री म्हणजे रेशमी बंध…

मैत्रीअसते स्वंच्छदी फुलपाखरासारखी,मनसोक्तपणे बहरलेल्या वसंतासारखी,मैत्री असावी पिंपळपानासारखी निरंतन जपून ठेवावीशी वाटणारी.या मैत्री मध्ये जात,धर्म,पंध,वय याच बंधन नसत…कारण,मनाशी मन जूळले की ह्यदयाच्या तारा अलगद छेडल्या जातात.त्यावेळी माया,ममता,विश्वास त्यागाच्या वेलीवर धुंधपणे बहरते,मोहरते,आयूष्याच्या या खडतर मार्गात एकमेकांना एकमेकांची साथ मीळते.मैत्री असावी नजरेत भरणारी,मनात सामावणारी,हवीहवीशी वाटणारी,सागराहूनही खोल,ज्योती सारखी प्रकाशित निरंतर तेवणारी,कधी न तूटणारी,मनामनात खोलवर दडलेली.   

     अगदि खरी आणि निस्वार्थि मैत्री लाभायला खरच खूप मोठ भाग्य लागत,आणि ज्यांना खरचं निस्वार्थि मैत्री लाभली ते खरच भाग्यवान असतात..!

रुपाली वागरे/वैद्यनांदेड

9860276241

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *