नांदेड ; दि.३१ ऑगस्ट २०२० रोजी जागतिक किर्तीचे साहित्यीक साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षीय जयंती सोहळ्याची सांगता होत आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनात मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती सोहळ्याची सांगता करुन त्यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्काराने सन्मानित” ,करण्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवावी अशी मागणी निवेदनाद्वारे साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषणप्रदेशाध्यक्ष – अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन प्रदेशाध्यक्ष तथा साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण ,संपादक उत्तम बाबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्या निवेदनात असे नमूद केले आहे की आपले राज्य व देश कोराना महामारीच्या संकटाशी लढतो आहे.आपल्या सुनियोजनात तो लढा आपले राज्य यशस्वीपणे लढत आहे व यात यश ही मिळत आहे.त्याबद्दल आपले व आपल्या सरकारचे मनापासून अभिनंदन !जागतिक किर्तीचे थोर साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक स्वातंत्र्य सेनानी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे दि.१ ऑगस्ट २०१९ ते दि.३१ ऑगस्ट २०२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या अनुशंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने जन्मशताब्दी वर्षात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचे गुणगौरव करण्यास्तव १०० कोटी रुपये मंजूर केले होते.परंतू आपल्या सरकारने कोरोनाच्या आड उपरोक्त अनुशंगाने छद्दामही खर्च केला नाही. जन्मशताब्दी वर्षा निमित्त साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना ” भारतरत्न पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी आपल्या पक्षाचेच खासदार राहूल शेवाळे यांनी लोकसभेत केली.तसेच या मागणीस्तव केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले व जवळपास २० खासदारांनी आपणास आणि प्रधानमंत्री मा.नरेंद्र भाई मोदी यांना शिफारस पत्र ही लिहले आहेत.याच बरोबर राज्यातील विधानसभा अध्यक्ष मा.नाना पटोले यांसह आजी माजी नामदार आमदार अशा जवळपास १०० च्या वर मान्यवरांनी ही आपणास व प्रधानमंत्री मा.नरेंद्र भाई मोदी यांना शिफारसपत्र लिहले आहेत.तसेच अनेक सामाजिक संघटना,समाजसेवक, समाज बांधव,विचार अनुययायी, साहित्यप्रेमी अशा आदींनी ही विनंतीपत्र आपणास आणि केंद्र सरकारकडे पाठविली आहेत. एवढेच नाही तर रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय अॅड.बाळासाहेब आंबेडकर यासह आदी उजव्या, डाव्या पक्षांच्या आजी माजी लोकप्रतिनिधींनी विनंतीपत्र लिहले आहेत.परंतू आपण किंवा आपल्या सरकारमधील सहकारी मंत्री महोदयांनी या मागणीकडे लक्ष दिलेले नाही.केवळ ना.जयंत पाटील यांनी दि.१ ऑगस्ट रोजी व ना.धन्यंजय मुंडे यांनी दि.१५ ऑगस्ट रोजी याबाबत सुतेवाच केले आहे हे अपवादात्मक म्हणावे लागेल. जन्मशताब्दी वर्षाची सांगता दि.३१ ऑगस्ट रोजी होत आहे.असे असतांना आपण याबाद कसलाही निर्णय घेतला नसल्याचे दिसत असून एक ब्र शब्दही बोलत नाहीत.यास काय समजावे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोना महामारीचे संकट जरुर आहे.यामुळे आपण जन्मशताब्दी वर्षात उपक्रम,कार्यक्रम घेणे टाळला असाल ? हे आम्ही समजून घेऊ शकतोत. परंतू या व्यतिरीक्त आपण,आपल्या सरकार मधील काही मंत्री व सरकारने अन्य ४ महापुरुषांच्या जन्मशताब्दीच्या औचित्याने विधान भवन मुंबई येथे वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,विधान भवन,मुंबई यांच्या वतीने जन्मशताब्दी सोहळे साजरे केले आहेत.जसे की,दि.११ मार्च २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण, ना.जयंत पाटील यांचे वडील स्व.राजाराम बापू पाटील,स्व.डॉ. जकेरीया व अन्य एक महापुरुष अशा चौघांचा जन्मशताब्दी वर्षीय गुणगौरव सोहळा घेण्यात आला आहे . .तर दि.१४ जुलै २०२० रोजी महाराष्ट्राचे भगीरथ स्व.डॉ. शंकरराव चव्हाण आणि दि.१२ ऑगस्ट २०२० रोजी स्व.राजाराम बापू पाटील यांचा जन्मशताब्दी वर्षीय जयंती सोहळा मोळ्या उत्साहात संपन्न करुन जन्मशताब्दी वर्षाची सांगता केली आहे.एवढेच नाही तर सा.बां. विभाग मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दि.२५ ऑगस्ट २०२० रोजी भोकर जि.नांदेड येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रम प्रसंगी स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मौ. भोसी ता.भोकर येथे १०० एकर जागेत पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले असल्याची घोषणा केली आहे. या केंद्रासाठी कोट्यावधीचा निधी लागणार आहे.तो आपण व आपले सरकार मंजूर करत आहे.परंतू आपण मागील सरकारने मंजूर केलेले १०० कोटी किंवा नविन वाढिव असे काहीही मंजूरही केलेले नाही व खर्च ही केलेला नाही.स्व.डॉ. शंकरराव चव्हाण व वरील सर्वच महारुरुष आमच्यासाठी नक्कीच श्रद्धेय आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने हे केंद्र व गुणगौरव जर होत असेल तर आम्हास आपला व आपल्या सरकारचा अभिमान आहे.त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.परंतू दुसरीकडे साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे ही हे वर्ष असतांना ना उपक्रम,ना कार्यक्रम,ना सोहळा ? चेंबूर मुंबई येथील त्यांच्या आतंरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी किंवा संगमवाडी,पुणे येथील आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या पावन समाधीस्थळीच्या स्मारकासाठी निधीचा छद्दाम ही आपण व आपल्या सरकारने दिला नाही.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या प्रती हा दुजाभाव दिसतोय.एक प्रकारे आपण व आपले सरकार साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षाच करत असल्याचे दिसत असून ही भूमीका न्यायीक नाही. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या अनुयायींच्या उन्नतीसाठी व सन्मानार्थ अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आर्टी’ निर्मिती आपण करावी म्हणून मागणी होत असतांना हे देखिल आपण टाळले आहे.सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी हयातीत महाराष्ट्र,देश व देशातील जनतेच्या सुखासाठी अनेक यातना भोगल्या आहेत. कर्तव्य बजावतांना तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना अनेक यातना दिल्या आहेत. त्यामुळे किमान मृत्यू नंतर तरी तशा यातना न देता आपल्या कडून यथोचित सन्मान व्हावा अशी अपेक्षा होत आहे.वंदनिय प्रबोधनकार ठाकरे यांच्या या लढवय्या सहका-यावर आपणांकडून अन्याय होणार नाही असे वाटते.आणि जर झालाच तर महाराष्ट्राच्या इतिहासात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्यावर,त्यांचे विचार अनुयायी,साहित्यप्रेमी व आदींवर अन्याय करणारे दुसरे कोण ? हे शोधले तर..अर्थात आपण मुख्यमंत्री आणि हे सरकार आहे अशी नोंद नक्कीच होईल असे वाटते.त्यामुळे आपणास व आपल्या सरकारला आमची नम्र विनंती आहे की,दि.३१ ऑगस्ट २०२० रोजी विधान भवन मुंबई येथे जागतिक किर्तीचे साहित्यीक साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षीय जयंती सोहळ्याची सांगता करावी व त्यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्काराने सन्मानित”,करण्याची शिफारस केंद्र सरकारला तात्काळ पाठवावी.आपण हे करालच याची आम्हास शाश्वती आहे,आणि असे न झाल्यास दि.३१ ऑगस्ट २०२० नंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषणप्रदेशाध्यक्ष – अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन प्रदेशाध्यक्ष तथा साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण ,संपादक उत्तम वामनराव बाबळे,सखाराम राजाराम मोरे,नामदेव लालबाजी वाघमारे,सिद्धार्थ जाधव,गंगाधर पडवळे,आदीच्या स्वाक्षरी आहेत.या निवेदनाच्या प्रतिलिपीमा.देवेंद्रजी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते,मा.जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड,मा.तहसिलदारतहसिल कार्यालय,मा.पोलीस निरीक्षकपोलीस ठाणे भोकर आदींना देण्यात आले. |