तुम्ही निवांत भक्ती करुन व्यवस्थित रीतीनं मला जगू द्या!’ – डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर


अहमदपूर -( दि.२८) :

माझ्या भक्तांनो, माझी प्रकृती फार चांगली आहे. तुम्ही काही काळजी करायची नाही. तुमची भक्ती, तुमची  श्रद्धा माझं आयुष्य वाढविणारी आहे. आणि तुम्ही निवांत घरी भक्ती करुन  व्यवस्थित रीतीनं मला जगू द्या‌ असा संदेश येथील राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज (१०४) यांनी त्यांच्या भक्तांना दिला आहे. महाराज संजिवन समाधी घेत असल्याची अफवा झाल्याच्या  पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं आहे. 

       लिंगायत समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे २८ आॅगस्ट रोजी संजीवन समाधी घेणार असल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशात महाराजांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.  भक्तीस्थळावर भाविकांनी दि. २७ तारखेच्या रात्रीपासून जमायला सुरुवात केली होती. त्यामुळे अहमदपूर नांदेड रस्त्यावरच्या मरशिवणी येथील भक्तीस्थळावर हजारोंच्या संख्येने भाविकांची तोबा गर्दी जमा झाली होती. या अफवेमुळे भाविक अस्वस्थ झाले असून महाराज समाधी घेणार नसल्याचे त्यांच्या आश्रमाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना सुरक्षितता बाजूला सारून भक्तजनांनी गर्दी केली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *