नायगाव ;
सततच्या पावसामुळे नायगाव धर्माबाद उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या मूग पिकांना जाग्यावरच मोड फुटले आहेत त्यामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे त्यात सोयाबीन पिकावर पिवळ्या रंगाचा रोग पडल्याने सोयाबीन देखील धोक्यात आले आहे त्यामुळे शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे धर्माबाद उमरी नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मराठा महासंग्राम संघटनेचे नांदेड व हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे व रिमझिम पावसाने मुग पिकाच्या शेंगांना प्रत्यक्षात मोड आल्याने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे प्रशासनाने तात्काळ पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत व तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश द्यावेत असेही निवेदनात म्हटले आहे नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यात सोयाबीन मूग उडीद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली प्रारंभी बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणी करावी लागली त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला असता पुढील पिकांना बर्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी समाधानी झाला परंतु मागील आठवडाभरापासून सतत धार व रिमझिम पावसामुळे तोंडनीस आलेल्या मूग उडीद पिकाच्या शेंगांना प्रत्यक्षात मोड फुटल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला त्यामुळे सदर विमा कंपनी व प्रशासनाचे अधिकारी यांनी त्वरित पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत व धर्माबाद नायगाव उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी २५ हजार नुकसान भरपाई व आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी मराठा महासंग्राम संघटनेचे नांदेड व हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
दिलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड, जिल्हा कार्याध्यक्ष ओम पाटील शिंदे, नायगाव तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.