नांदेड -काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात मार्गक्रमण करीत आहे. या पदयात्रेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बंदोबस्तात अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील 1212 पुरुष व महिला होमगार्ड सहभागी झाले आहेत.
भारत जोडो पदयात्रा बंदोबस्ताची नांदेड जिल्ह्यातील महिला व पुरुष होमगार्ड यांची तयारी केल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती. अपर पोलीस अधीक्षक नांदेड तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे यांनी बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करून वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करून सूचना केल्या. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यात सतत कार्यतत्पर असलेल्या होमगार्ड यांचा पदयात्रेसोबत चालण्याचा सराव पोलीस मुख्यालतील कवायत मैदानावर घेण्यात आला. या सराव प्रशिक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांबरोबर केंद्र नायक अरुण परिहार, सामग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, पलटन नायक बी.जी. शेख, बलबीरसिंघ चरणसिंघ, बळवंत अटकोरे यांनी परिश्रम घेतले.
नांदेड पथकातील 500, कंधारमधील 105, हदगाव मधील 102, बिलोलीमधील 147, भोकर मधील 85, देगलूर मधील 88, मुखेड मधील 78 व किनवट पथकातील 107 असे जिल्ह्यातील 1212 महिला व पुरुष होमगार्ड बंदोबस्तात सहभागी झाले आहेत. खा. राहुल गांधी व इतर नेत्यांच्या पदयात्रेत पोलिसांनी यु- रोप, रिअर- रोप टिमच्या माध्यमातून जे सुरक्षा कवच तयार केले आहेत. त्यात 120 होमगार्ड यांचा समावेश असून ते आपली जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत.
सदरील बंदोबस्त यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासिक अधिकारी भगवान शेटे,केंद्र नायक अरुण परिहार, सामग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर, समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, मधुकर वानखेडे, बालाजी डफडे, राजू श्रीरामवार, संजय कोंडापलकुलवार,कंपनी नायक डॉ. अनिल पाटील . डॉ. अशोक बोनगुलवार, अंशकालीन लिपिक बी. जी. शेख,दीपक काकडे,मोहम्मद अन्वर, प्रल्हाद एडके, अशोक पैलावार, कैलास पाटील, मानसेवी अधिकारी रामराव क्षीरसागर, मिर्झा सुलतान बेग, बलबिरसिंघ चरण सिंघ,रवी जेंकूट, बळवंत अटकोरे, मष्णाजी पैलावार, गुंडेराव खेडकर, भीमराव जोंधळे, राजकुमार कदम, विश्वनाथ काळे, यादन्ना शिलम आदी प्रयत्नशील आहेत.