कंधार : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ९ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यत अचार सहिता जाहीर झाली आहे .
ग्रामपंचायत निवडणूक नोटीस १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत आहे. छाननी ५ रोजी होईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख ७ डिसेंबर पर्यंत आहे. चिन्ह वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी ७ डिसेंबरला प्रसिद्ध होईल.
कंधार तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. यामध्ये जंगमवाडी, लालवाडी, पोखर्णी, सोमठाणा, गुलाबवाडी, नवरंगपुरा, मानसपुरी, गांधीनगर, उमरज, पाताळगंगा, चौ धर्मापुरी, सावरगाव नि, कोटबाजार, इमामवाडी, दिग्रस खु, घुबडवाडी आदी ग्रामपंचायती आहेत .
वरील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचे मतदान १८ डिसेंबर, मतमोजणी आणि निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
या कामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, अव्वल कारकून पी. एम. जोंधळे , मन्मथ थोटे आदी कार्यरत आहेत.