कंधार (ता. प्र.) दि.१९ व २० नोव्हेंबर रोजी पिंपरी- चिंचवड, पुणे येथे होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ॲड. दिगंबर गायकवाड यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन दि.१९ व २० नोव्हेंबर असे दोन दिवस पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे .या अधिवेशनात विविध विषयावर चर्चासत्र,परीसंवाद पत्रकारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह मराठी सिनेअभिनेता खा.अमोल कोल्हेची प्रगट मुलाखतीसह भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व जेष्ठ पत्रकारांची उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनात आम्ही अँकर, चर्चासञ याबरोबरच डिजिटल मीडिया हे प्रिंट मीडियाला धोकादारक ठरत आहे का ? या विषयावर परीसंवाद होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ॲड.दिगंबर गायकवाड यांनी केले असून अधिवेशनास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम. देशमुख, परिषदेचे विश्वस्थ किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होणार असल्याचेही ॲड. गायकवाड यांनी सांगितले.