बळी आंबुलगेकर यांना पितृशोक ;किशनराव रामराव अंबुलगेकर यांचे निधन

कंधार ; प्रतिनिधी

आंबुलगा तालुका कंधार येथील ज्येष्ठ नागरिक तथा फुले आंबेडकरी चळवळीचे पाईक किशनराव रामराव अंबुलगेकर यांचे आज रविवारी सायंकाळी चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्षाचे होते .

सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर आंबुलगा ता . कंधार जि नांदेड येथे अंतिम संस्कार केले जातील .

त्यांच्या पश्चात पत्नी हरिबाई अांबुलगेकर, तीन मुले,चार मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत किशनराव अंबुलगेकर हे साहित्यिक बळी अंबुलगेकर आणि दिनकर आंबुलगेकर,रमाकांत अंबुलगेकर यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *