कंधार ; प्रतिनिधी येलूर ता. कंधार येथील सर्व योजनेच्या कार्डधारकांना पर्यायी व्यवस्था लाडका दुकानदाराकडून धान्य वाटप बरोबर होत नाही त्याची चौकशी करण्यासाठी कंधार तहसिल कार्यालया समोर येलूर गावकऱ्यांनी अमरण उपोषण पुकारले .
या बाबत निवेदन देण्यात आले त्यात असे नमूद केले आहे की सध्या येलूर ता. कंधार जि.नांदेड येथील सर्व योजनेचे कार्डधारक लाभार्थी यांची माहे मार्च 2022 पासून लाडका ता. कंधार येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे पर्याय व्यवस्था जोडली आहे.
तेंव्हापासून पंतप्रधान गरिब कल्याण 29 अंतर्गत धान्य व नियमित मिळणारे धान्य बरोबर दर महा मिळालेच नाही. कार्डधारकाचे वाटपाचे अंगठे घेतले जातात आणि त्यांना धान्य मिळत नाही. जे वाटप केले जाते त्यांना नियमाप्रमाणे, धान्य मिळत नसून प्रती काडांस एका व्यक्तीचे धान्य जात नाही तसेच त्यांच्याकडून चढया दराने पैसे घेतले जातात त्यामुळे गोर-गरिबाची उपसमार होत असून त्यांना शासनाच्या योजने पासून वंचीत रहावे लागत आहे.
आम्ही पर्यायी व्यवस्था धारक स्वस्त धान्य दुकानदार हरीनाम पाटील शिंदे यांच्याशी फोनवरुन व प्रत्यक्ष वारंवार धान्याची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली व तुम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. तहसील कार्यालयांनी तुमचा माल रोखून धरला आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे.
तं तुम्ही करु शकता मला माल पुरत नाही. मी तुम्हाला धान्य देवू शकणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा अशा प्रकारची भाषा करीत आहे. आमच्या गावामध्ये सार्वजनिक तीन सभागृह असतांना त्यांनी सरपंचाच्या घरी धान्य टाकले आहे. हा मला कुणाच्या मालकीचा नसुन तो सार्वजनिक असल्यामुळे तो माल सार्वजनिक सभागृह ग्राम पंचायत कार्यालयातून वाटप करण्यात यावा. कारण हा माल कुण्या एका सरपंचाच्या मालकीचा नसून संपूर्ण कार्डधारकांचा आहे.
वरील सर्व बाबींचा योग्य विचार करुन अशा उघड व मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार करणाऱ्या दुकानदाराची तातडीने चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी आणि तुर्तास सदरील कार्डधारकास दुसरीकडे पर्याय व्यवस्था करुन सहकार्य करावे. यासाठी सुभाष थोराजी शिंदे व समस्त कार्डधारक यांनी उपोषण सुरु केले .