पार्डी(मक्ता):ता.अर्धापूर येथील राजाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या महान विचारांनी आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारे लोकनायक क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरदराव देशमुख तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लिपिक प्रकाशराव देशमुख, कनिष्ठ लिपिक माधव देशमुख, पर्यवेक्षक बालाजीराव गडगूळ, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख मारुती हणमंतकर, मराठी विभाग प्रमुख हणमंतराव अनमुलवार यांची उपस्थिती होती. यावेळी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना आदिवासींच्या विकासासाठी संघर्ष करणारे ते जननायक होते असे विचार हणमंतराव अनमुलवार यांनी मांडले.शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना १५नोव्हेंबर,१९६७रोजी स्थापना झाली.तेव्हापासून आजतागायत अनेक प्रश्नांसाठी लढा दिला.स्थापना दिवस हा शिक्षकेत्तर कर्मचारी दिन साजरा करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.म्हणून हा शिक्षकेत्तर कर्मचारी दिन साजरा करण्यात येत आहे असे प्रकाश देशमुख यांनी प्रतिपादन केले.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक शरदराव देशमुख यांनी शिक्षकेत्तर कर्मचारी हा शाळेचा महत्वाचा कणा आहे.
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आदिवासींच्या विकासासाठी संघर्ष केला तो विसरता येणार नाही असे म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव कांजाळकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनाजीराव देशमुख, नारायण शिंदे,शिला रामगिरवार, विनायक चट्टे,गोविंद जायभाये, बालाजी बेकार,बालाजी राठोड,यादराम पाल, बळीराम वानोळे यांनी प्रयत्न केले.