- कंधार ; दिगांबर वाघमारे
गटसाधन केंद्र कंधार येथे शालेय स्थरावरील विविध समस्यां सोडवण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन दि .१७ नोव्हेबर रोजी करण्यात आले होते
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार चे बॅक मॅनेजर यांच्याशी चर्चा आणि मुख्याध्यापकांना गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी मागदर्शन केले .
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार येथे विद्यार्थांच्या प्राप्त शासनाच्या विविध योजनांची लाखो रुपयांची रक्कम लाभार्थी विद्यार्थांच्यां खात्यावर जमा करण्यास मुख्याध्यापकांना अडचणी येत आहेत . वेळेत रक्कम विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार चे मॅनेजर रिनायर विलास व फिल्ड ऑफीसर दास यांच्याशी चर्चा करण्यात आली . व तात्काळ सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी केले .
आढावा बैठकीत दरम्यान विद्यार्थी आधार अपडेट , मिसमॅस विद्यार्थी , युडायस प्रणाली , नवनविन अभ्यासाचे अप्स , शालेय पोषण आहार योजना , विविध शिष्यवृती , अद्यावत शालेय रेकार्ड अपडेट ठेवणे आदीप्रश्नासह शैक्षणिक कार्यावर गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांचे मागदर्शन केले .