लोहा कंधार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून शिंदे कुटुंबीय सदैव कटिबद्ध- सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे

कंधार/ प्रतिनिधी

फुळवळ ता.कंधार येथे पाच लक्ष रुपयांच्या सी.सी. रोड कामाचे लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते काल रविवारी उत्साहात संपन्न झाले .

यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताईंचा यथोचित स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आशाताई म्हणाल्या की, फुलवळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या तीन वर्षात आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या माध्यमातून 51 लक्ष रुपयाचा निधी देण्यात आला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून लोकांच्या प्राथमिक गरजा आरोग्य,शिक्षण, दळणवळण यावर विशेष भर देऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे, यापुढेही लोहा कंधार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही शिंदे कुटुंबीय सदैव कटिबद्ध आहोत असे यावेळी म्हणाल्या यावेळी गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि जागीच सोडवन्यासाठी प्रयत्न केला याप्रसंगी आमदार शामसुंदर शिंदे समर्थक तथा कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण मंगनाळे यांचा वाढदिवस साजरा करून आशाताईंनी व गावकऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच विमलताई मंगनाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार सभापती ज्ञानेश्वर चोंडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेरु भाई,प्रल्हाद डिगोळे, सरपंच शिवाजी सोमासे,चेअरमन राजू डफडे, अशोक बोरगिरे, गिरीश डिगोळे,शंकर डिगोळे, महेश पिनाटे, बाळू मंगनाळे, प्रवीण मगनाळे, माजी सरपंच बालाजी देवकांबळे, वसंत मंगनाळे, पत्रकार विश्वंभर बसवंते, संदीप मंगनाळे, नागेश गोधने, धोंडीबाराव मंगनाळे, बबनराव कुलकर्णी, विठ्ठलराव बोरगावे, नारायण शेंबाळे, चंदबस मंगनाळे, बालाजीराव मंगनाळे, आनंदा पवार सहकार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *