नांदेड ; बँकांचं राष्ट्रीयकरण की देश हितासाठीचे अन्य निर्णय विरोधकांचा विरोध झुगारून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच त्यांची आयर्न लेडी अशी ओळख असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आहे.
शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवा मोंढा येथील काँग्रेसच्या कार्यालयात शनिवार दि. १९ नोहेंबर रोजी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते या प्रसंगी काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते आ.अमरनाथ राजूरकर,माजी मंत्री डी.पी.सावंत,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा,जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण,ॲड.सुरेंद्र घोडजकर, कविताताई कळसकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, शंकररराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना आपली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेट झाली. त्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. बँकांचं राष्ट्रीयकरण असो की देश हितासाठीचे अन्य निर्णय त्यांनी कधीही विरोधा समोर झुकल्या नाहीत देशाला विकासात प्रगतीपथावर व मजबूत करण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला याच भूमिकेतून माजी पंतप्रधान राजीव गांधी तर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी कार्य करीत आहेत . देश हिताच्या धाडसी निर्णयामुळे पोलादी पुरुष अशी सरदार वल्लभभाई पटेल तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आयर्न लेडी अशी ओळख असल्याचे सांगितले आहे. यावेळी माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले,आनंद चव्हाण, अब्दूल गफार, ॲड. सुभाषराव कल्याणकर, पप्पू पा.कोंढेकर, विनोद कांचनगिरे, रंगनाथ भूजबळ, बालाजीराव गव्हाणे,राजू शेट्टे, महंमद हमीद खान, अनंत तुपदाळे, नारायण श्रीमनवार, सरजितसिंग गिल, संभाजी पुय्यड, संजय देशमुख लहानकर, बालाजी पांडागळे, अब्दूल गफार, अपर्णा नेरलकर, सत्यजित देशमुख तरोडेकर, गंगाधर सोंडारे, प्रा.कैलास राठोड, सुधाकर पाटील जाधव, माधव पवळे, प्रसाद हरण, , गुरुनाथ पा.पाळेकर, बाळासाहेब मोरे, महेश मगर, गंगाधर सोनकांबळे, अनिल कांबळे, शशिकांत क्षिरसागर, शिवाजी पवार लहानकर, नवल पोकर्णा, संजय लोणे, अशोक जिंके ,साहेबराव धनगे, पुनिता रावत, जयश्री राठोड, अरुणा पुरी, सुमित मुथा, प्रणिता मारणे, प्रफुल सावंत, मकसुद अर्धापूरकर, अब्दुल लतीफ अब्दुल करीम, धिरज यादव, सुनंदा सुभाष पाटील, ललिता कुंभार, अश्विनी तुपदाळे, प्रणिता कानडखेडकर, रजिया बेगम महम्मद आयुब, डॅनी, धिरडीकर, आनंदा गायकवाड, बालाजी चव्हाण, अविनाश कदम, संजय पांपटवार, प्रविण कुपटीकर, सत्यपाल सावंत, विजय येवनकर, नागनाथ गड्डम, दुष्यंत सोनाळे, दिपक मारतळे, लक्ष्मीकांत इंगोले, शिवाजीराव देशमुख बरबडेकर, सलमान बबीशार, अजिम शेख, हणमंत मालेगावकर, शिवराज कांबळे, कामाजी आटकोरे, संजय वाघमारे, डॉ.शेंगुलवार, इंजि.नसीम जावेद पठाण, गायकवाड मॅडम, बालाजी सोरगे, डॉ.अशोक कलंत्री, सुनील देशमुख बारडकर, सुभाष पाटील, भि.मा.गायकवाड, ॲड.बाळकृष्ण शिंदे, शिवहरी गाडे, ॲड.धडके, उमाकांत पवार आदींची उपस्थिती होती. नांदेड रिझल्ट देणारा जिल्हा काँग्रेस पक्षाने विकासाच्या भूमिकेतून जनसामान्यांचे काम केले यामुळे जनता सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली महापालिका, ज़िल्हापरिषद ,नुकत्याच झालेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना ,सिनेट निवडणुकीतही आपल्या पँनलला मोठे यश मिळाले आहे नांदेड रिझल्ट देणारा जिल्हा आहे. या पूर्वीच्या यशाची पुनरावृत्ती आगामी निवडणुकांत व्हावी यासाठी सामान्यांच्या कामांसाठी अग्रेसर रहा व निडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. भारत जोडो यात्रा नियोजनाची प्रशंसा भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी यासाठी आपण सर्वांनीच मोठे परिश्रम घेतले यामुळेच यात्रा यशस्वी झाली असून नांदेडकरांच्या भारत जोडो यात्रा नियोजनाची प्रशंसा होत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सांगितले आहे. विकासासाठी प्रयत्न शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेतला मात्र अलीकडे विकासात अडथळे ,स्थगिती आणून जाणीवपूर्वक विकास होऊ नये असा प्रयत्न सुरु आहे मात्र आपण शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत यामुळे विकासाच्या कामास पुन्हा गती मिळवून देत जिल्ह्याचा विकास करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे.