नांदेड : महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या यशोशिखरावर नेण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेनाच सर्वसामान्यांचे हित साधू शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेनेचे उपनेते तथा नांदेड हिंगोलीचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी शिवसैनिकानी खचून न जाता मोठ्या उमेदीने पक्ष वाढीसाठी कामाला लागले पाहिजे असे आवाहन केले. शिवसेनेचे उपनेते तथा नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी केले नांदेड येथे आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची त्यांनी आढावा बैठक घेतली .या बैठकीत ते बोलत होते.
महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रत्नमालाताई मुंडे, खासदार हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर ,शहर प्रमुख तुळजेस यादव, बाबुराव कोहळीकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा खरपूस समाचार घेतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवराही आसूड ओढले. काँग्रेसने या देशाचे वाटोळे केले असताना देखील काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या रूपाने झाले होते. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, शिवसेना पक्ष बुडाला तरी चालेल परंतु काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आमच्यावर कधी येऊ देणार नाही . अशी डरकाळी त्यांनी फोडली होती . मात्र हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही डरकाळी त्यांच्याच मुलांनी आणि नातवाने अक्षरशः धुळीस मिळवली. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करून शिवसेनेचे अस्तित्व संपवून टाकण्याचे काम केले आहे . त्यामुळे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील हिंदुत्व आणि शिवसेना या महाराष्ट्रात उभी करण्यासाठी, हिंदुत्वाला बळकटी देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम सुरू आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवा महाराष्ट्र आपण बघणार आहोत. राज्याला नवी बळकटी येणार आहे. शेतकरी ,शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. जनतेचे हित लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मंजूर केला. पिक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली. सर्वसामान्य लोकांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी आनंदाचा शिधा देऊन गरिबांच्या घरातही मिष्ठान्न पोहोचवले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या महाराष्ट्राचा खंबीर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा गौरव करावा लागेल. गोरगरीब जनतेच्या हिताचा कळवळा असणारा हा बाळासाहेबांचा वाघ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना आहे. तुम्हा आम्हासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वंदनीय आहे. त्यामुळे संकोच न करता, घाबरून न जाता, ना उमेद न होता प्रत्येक शिवसैनिकांनी आता जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत निश्चितपणे युती करेल आणि आगामी काळातील शिवसेना आणि आगामी काळातील निवडणुका आपण निश्चितपणे जिंकू. राज्यातील जनता, 42 आमदार आपल्या पाठीशी आहेत . पंधराहून अधिक शिवसेनेचे खासदार आपलेकडे आहेत . त्यामुळे कोलाही घाबरून जाण्याची कारण नाही. सत्ता आपल्या पाठीशी आहे . आपण सत्तेत आहोत . त्यामुळे विकास कामासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही. खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड आणि हिंगोलीच्या विकासाचा कायापालट होतो आहे. कधी नव्हे इतका निधी या दोन्ही जिल्ह्याला मिळतो आहे . खासदार हेमंत पाटील यांनी तर विकासासाठी अक्षरशः अहोरात्र प्रयत्न केले. त्यामुळे हिंगोली मध्ये हळद प्रकल्प उभारू शकत आहे . परिणामी नांदेड आणि हिंगोलीच्या विकासाचा पाया अधिक भक्कम होणार आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाता बाळासाहेबांची शिवसेना अधिक भक्कम करण्याची आणि आगामी काळात महाराष्ट्राची हित साधण्याची गरज आहे . मात्र यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेतला प्रत्येक शिवसैनिक इमानदारीने, प्रामाणिकपणे आणि आपल्या नेत्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची गरज आहे.त्यातून आगामी काळ आपलाच असेल असा विश्वास आहे आनंदराव जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी उपस्थितना मार्गदर्शन केले. महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रत्नमालाताई मुंडे यांनीही शिवसैनिकांची हितगुज साधले. या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भारत जोडीचे यात्रेत दोन पप्पू एकत्र
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला .असे असताना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावण्याचे पाप उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना करते आहे. एवढेच नाही सत्तर वर्षे देशाला लुटलेल्या काँग्रेसने काढलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या पप्पू सोबत शिवसेनेचा पप्पू सहभागी झाला. दोन्ही पप्पू एकमेकांच्या गळ्याला गळा लावत होते. उभ्या महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या पप्पूची थट्टा करत आहे. त्यामुळे आता त्या शिवसेनेचा विषय उरलेला नाही. दोन पप्पू एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. आपण निष्ठेने काम करा आपल्याला कोणत्याही पप्पुची गरज भासणार नाही कारण आपला मुख्यमंत्री आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खंबीर आहे कोपरखळी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी मारली.