अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३ हायवावर कंधार तहसील प्रशासनाची कारवाई

 

कंधार / प्रतिनिधी

गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या कंधार महसूल विभागामार्फत रात्रीचे पथक तयार करून अवैध वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांवर कंधार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

कंधार तालुक्यात परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या वाळू चोरटी वाहतूक करणाऱ्या एम एच २६ बिल. ई. ८७४९, एम एच ४४यू. ४२४२, एम एच २६ बिई ५२००, या ३ वाहनांवर महसूल विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून त्यांना ७ लाख ४९ हजार रुपयांचा अंदाजे दंड ठोठावण्यात येईल. रक्कम वसूल करण्यात येईल.

दंड भरण्याबाबत नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक व विक्री केली जाते.

वेळोवेळी महसूल विभागामार्फत अशा वाहनांवर कारवाई करून त्यांना आर्थिक दंड भरण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. गेल्या काही महिन्यात महसूल विभागाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्याप्रमाणावर कारवाई केली आहे व ही वाहने तहसील कार्यालय परिसर, जप्त करून ठेवली आहेत.

कंधार महसूल विभागाने रात्रीचे पथक मध्ये नायब तहसीलदार संतोष कामटेकर, मंडळ अधिकारी एस एम पटणे, मंडळ अधिकारी एस आर शेख, मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगांवकर, तलाठी बालाजी केंद्रे, तलाठी गजानन शिंदे, शिपाई लागे, वाहन चालक इस्माईल बेंग पोलिस कर्मचारी मुखेडकर या पथकात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *