पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे ;पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनात आज दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे′ म्हणाले – शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला.

 वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.
 पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल.
मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी २५ लाख रुपये देण्यात येतील.
 राज्याला पुढे नेण्यासाठी विकास पत्रकारिता महत्वाची
 लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात, स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात.
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील.

 मराठी पत्रकार परिषद देशातील पहिली संघटना आहे. ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने गोवा, बेळगाव, बिजापूर, कारवार आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शाखांसह सयुंक्त महाराष्ट्र साकारला याचा सर्वांना आनंद आहे.

 आचार्य अत्रे, बाळासाहेब भारदे, नरेंद्र बल्लाळ, नारायण आठवले, अनंत भालेराव अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले.

 आज समाज माध्यमामुळे वृत्तांकन गतिमान होत आहे. चहूबाजूने माहितीचा मारा होत असताना बातमीत सत्यता राखण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. वाचकाचा विश्वास कायम ठेवण्याचे आवाहनही आहे आणि म्हणून संघटनेची प्रबोधनाची भूमिका महत्त्वाची आहे.
चार महिन्यात जनकल्याणाचे अनेक महत्त्त्वाचे निर्णय घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *