सुलतानपुरा कंधार येथिल राहते घरी एकाने बेकायदेशीरपणे लोंखडी तलवार बाळगण्या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा नुसार कंधार पोलीसात आज दि.२१ नोव्हेबर रोज सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला .
याबाबत असे की कंधार शहरातीत सुलतानपुरा येथे एका आरोपीने आपल्या जवळ लोंखडी तलवार बाळगली असल्याचे कोन्हीतरी पोलीसांत सांगितले तेव्हा कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस बालाजी विश्वामंर केंद्रे यांना सदर आरोपी बेकायदेशीर रित्या लोखंडी तलवार बाळगलेला मिळुन आला .भारतीय हत्यार कायदा नुसार पोलीस बालाजी विश्वामंर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोहेकॉ सानप करत आहेत .