ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सवी निमित्य श्री शिवाजी विद्यामंदीर कंधार येथे शालेय विद्यार्थांची नेत्र तपासणी ;व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन चा उपक्रम

कंधार ; प्रतिनिधी

श्री शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळा कंधार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त, संयोजक प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार व व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु भगिनींची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप समारोह आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हरिहर चिवडे हे होते . कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने व ज्ञात अज्ञात हूतात्म्यानां आदरांजली अर्पण करुन करण्यात आले. नंतर अध्यक्ष हरिहर चिवडे व प्रमुख पाहुणे व्हिजन स्प्रिंग फाऊंडेशन इंडियाच्या दर्शना नौकरकर मॕडम यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे आराध्य दैवत मातोश्री मुक्ताई यांच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले.

नंतर शाळेच्या वतीने विद्यार्थीनींच्या हस्ते पथक प्रमुख दर्शना नौकरकर मॕडम, डॉ. सोनल लांडगे मॕडम, प्रतिक्षा पाटील मँडम व, समन्वयक अजिंके पतंगे यांचा शाल व पुष्प घालुन सत्कार करण्यात आला .नंतर शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक यांची नेत्र तपासणी करुन आवश्यकता असलेल्या विद्यार्थी व शिक्षकास चष्मा वितरीत करण्यात आला. यावेळी पत्रकार तथा महात्मा फुले प्राथमिक शाळे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यानी सदीच्छा भेट देवून या उपक्रमाचे कौतुक करूण सदिच्छा दिल्या.या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री वडजे एम एम, श्री शिंदे एच बी, श्री भालेराव देविदास ,श्री धोंडगे गजानन, श्री कदम संभाजी श्री भोसिकर शिवानंद यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *