आगरतळा येथील अखिल भारतीय स्पर्धेत मिना सोलापुरे द्वितीय पुरस्काराने सन्मानित

नांदेड :- केंद्र शासन व त्रिपुरा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आगरतळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा, संगीत व नृत्य स्पर्धेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन मिना अंबादासराव सोलापुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल नांदेड जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य संघाकडून त्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या शासकिय संघात त्यांची निवड झाली होती. समूह गायन स्पर्धेत मिना सोलापुरे यांच्यासमवेत सुधीर पलांडे, जितेंद्र धनु, अजिम शेख, दिलीप मोहरी, योगेंद्र केजळे व उषा धनु हे सहभागी झाले होते. त्यांनी गायलेल्या समूह गिताला भरत लब्दे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. अरुण साळुंके व विशार्म कुलकर्णी यांनी तबल्यासाठी साथ दिली. या स्पर्धेचे व्यवस्थापक श्रीमती मंगल नाखवा व प्रविण राणे यांनी नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *