राज्यभरातील गरजु विद्यार्थ्यांना मदत करणारी सामाजीक संस्था प्रवाह फाउंडेशन या संस्थेने कंधार शहरातील रवींद्रनाथ टागोर प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे.विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळावी , अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनालयासाठी पुस्तके, याशिवाय वह्या, कंपास पेटी, रंग पेटी, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी शैक्षणिक साहीत्य विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव यन्नावार यांचे हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक श्री एस. जी. मुंडे यांच्यासह शिक्षक श्री आर. एच. सुर्यवंशी, श्री तिडके ई. पी., श्री व्ही.डी . हनुमंते, श्री.होंडाळे, श्रीमती शेख वाय. आय. श्रीमती एम. जी. यन्नावार, पालक दिनेश डुबुकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव गंगाप्रसाद यन्नावार म्हणाले, ” ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन मदत करणार्या प्रवाह फाउंडेशन ने कंधार येथील रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असुन संस्थेचे वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्री मुंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रवाह फाउंडेशन यांनी केलेल्या मदतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सहकार्य होणार आहे. शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून आम्ही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करु यासाठी आम्ही प्रवाह फाउंडेशन चे आभार व्यक्त करतो. शैक्षणिक साहित्यामध्ये आकाशगंगा चार्ट, ग्रहांची माहीती चार्ट, परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची माहीती चार्ट, व्याकरण चार्ट, विज्ञान चार्ट, अंतराळ वीरांचेे माहीती चार्ट, गणित चार्ट, महापुरुषांच्या माहीती चे चार्ट, तरंग चित्र संच, उजळणी संच, शास्त्रज्ञांची माहीती चार्ट, बालमित्र संच, नकाशे, जल प्रतिज्ञा फलक, यासह ईतर साहीत्य देण्यात आले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना वह्या, उजळणी पुस्तक, रंग पेटी, कंपास पेटी, अवांतर वाचनाची पुस्तके प्रवाह फाउंडेशन यांनी उपलब्ध करुन दिली आहेत.
यावेळी गंगाप्रसाद यन्नावार यांनी मार्गदर्शन केले, सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन तिडके ई. पी. यांनी केले.