नवे विचार, नवी समीकरणे,नवी संकल्पना,महाराष्ट्राच्या राजकारणात मनोहर धोंडे यांची नवीन “सेना”
पंकजा मुंडे, महादेव जानकर, मनोहर धोंडे नवीन समीकरणे जुळवणार?
कंधार ; प्रतिनिधी
लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी 28 जानेवारी 1996 रोजी शिवा संघटनेची स्थापना झाली. गेल्या 27 वर्षापासून शिवा संघटना ही देशभरात काम करते. महाराष्ट्रातील विविध भागात या संघटनेच्या पाच हजाराहून अधिक शाखा आहेत,तर राज्यात बाहेर ही शिवा संघटनेच्या शाखा आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करत असतानाच ओबीसी समाजाच्याही अनेक निर्णय या संघटनेने घेतली आहेत. प्रा.मनोहर धोंडे हे मूळ हिंदुत्ववादी विचाराचे असून त्यांनी 1987 साला पासून शिवसेनेचे काम केले आहे. शिवा संघटनेची वाढती ताकद लक्षात घेता नवे विचार नवी समीकरणे नवी संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात मनोहर धोंडे यांची नवी सेना 28 जानेवारी 2023 रोजी उदयास येणार आहे. या नवीन सेनेची स्थापना होतात पंकजा मुंडे, महादेव जानकर व प्रा. मनोहर धोंडे हे येणाऱ्या निवडणुकीत नवीन समीकरणे जुळवणार असल्याचे जोरदार चर्चा आहे. प्रा. मनोहर धोंडे हे 1987 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी सेनेचे काम करत होते. पक्षाचे काम करत असताना समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण काम केले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी 1996 सारी नांदेड येथे शिवा संघटनेची स्थापना केली आज शिवा संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सध्याचे राजकारण जात +पैसा यावरच आधारित झाले असल्याने तरुणांना राजकारणात म्हणावी तशी संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात येणार आहे. मनोहर धोंडे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील असल्याने त्यांचे विचारही हिंदुत्ववादी विचार आहेत ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांनी ओबीसी अनुसूचित जाती व सामान्य माणसांना न्याय देण्याचे काम करून त्यांना सत्तेत वाटा दिला. आज महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती ती राहिली नसून जात व पैसा याची समीकरणे जोडल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात संपूर्ण घराणेशाही झाली असून प्रस्थापित नेत्यांचे मुलेच सत्तेचा वाटा चाकत आहेत. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे व महाराष्ट्रातील विस्थापित तरुणांना सत्तेत वाटा मिळाला पाहिजे यासाठी या नवीन येणाऱ्या सेनेची स्थापना केल्या जाणार आहे. प्रा.मनोहर धोंडे धाडसी व आक्रमक बाणा असलेला नेता म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. नवीन सेनेचा अजेंडा काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणी करत असताना पक्षाची घटना काय असते हेही महत्त्वाचे असते. धोंडे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे असल्याने त्यांची पक्षाची घटनाही जेमतेम शिवसेनेच्या शिवसेनेच्या घटने सारखीच असेल असा अंदाजही व्यक्त केल्या जात आहे.नवे विचार, नवी समीकरणे,नवी संकल्पना,महाराष्ट्राच्या राजकारणात मनोहर धोंडे यांची नवीन “सेना” जानेवारी महिन्यात येणार आहे.
चौकट पंकजा मुंडे, महादेव जानकर ,मनोहर धोंडे या तिघांमध्ये खूप जवळीक संबंध आहेत.सध्या भाजपा मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर होत असलेला अन्याय लक्षात घेता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काहीतरी वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्रात ओबीसीची असलेली ताकद दाखवण्यासाठी हे तीन नेते एकत्र येऊन नवीन समीकरणे जुळवणार असल्याचीही जोरदार चर्चा चालू आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड मतदार संघामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला होता ,यात या तिघांनाही चांगल्या प्रकारे यश आले आहे. लिंगायत ,वंजारी ,धनगर व इतर ओबीसी समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात काय चित्र निर्माण होऊ शकते याचा प्रयोग येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात केल्या जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे.