बोरी बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या विकास कामासाठी  निधी कमी पडू देणार नाही -खा. चिखलीकर

 

फुलवळ  ; धोंडीबा बोरगावे

बोरी (बु)परिसराचे नंदनवन झाले पाहिजे.या परिसरातील जनता मायाळू आहे.महादेव मंदिराला मानणारी जनता आहे. त्यामुळे देवाच्या जे मनात आहे ते फक्त मी करीत आहे.त्याआहे.हे माझे भाग्य आहे.या परिसरातील विकास कामासाठी कसल्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू देणार नाही.असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

 

कंधार तालुक्यातील बोरी(बु)येथील येथे भव्य भागवत कथा ,अखंड हरिनाम सप्ताह व गाथा परायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.यावेळी खासदार चिखलीकर यांनी ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे शाल पुष्पहार घालून स्वागत केले.व आज सप्ताहाला सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार चिखलीकर बोलत होते.

 

 

पुढे बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले की तीन हजार लोक जेवण करतील असे भव्य सभागृह बांधण्यात आले आहे तसेच तीन हजार लोक बसतील असेही सभागृह बांधण्यात आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध सभागृहाचे उद्घाटन लवकरच करण्यात होणार आहे. शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिराचा मी अध्यक्ष आहे मी जे जे काही या मंदिराच्या विकासासाठी निधी मागितला आहे तो मला मिळालेला आहे.परमेश्वराचे जे काम आहे ते माझ्या हातून होत आहे. त्यामुळे माझे भाग्य आहे असे खासदार चिखलीकर यावेळी म्हणाले.

 

या कार्यक्रमास बोरी बुद्रुकचे सरपंच बालाजी झुंबाड,उपसरपंच प्रतिनिधी देवानंद सांगवे, प्रकाश तोटावाड, उपअभियंता शिंदे, पंचायत समिती सदस्य शिंदे, भाजपा भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड, मधुकर डांगे, गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील,रज्जत शहापुरे,प.स.सदस्य डुबुकवाड,जे.ई.केद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *