नवीन ट्रेंड

… नवीन ट्रेंड….

बाजारात रोज नवनवीन ट्रेंड येतात इथे हा ट्रेंड आलाय सोशल मिडीयावर.. लोकांची मानसिकता इतक्या खालच्या दर्जाची असते याचं हे उत्तम उदाहरण .. अगदी यामध्ये उच्चशिक्षीतच जास्त आहेत कारण इतर माणसं काम करुन स्वतःला सिध्द करण्यात बिझी असतात आणि ही मंडळी नवीन ट्रेंडमधे बिझी असतात..

एक स्त्री .. एकदम बिंधास्तपणे बोलते ,,वागते म्हणजे ती आपल्याला पटेल ही मानसिकता असते.. तिच्याशी बोलल्यावर त्याच्या लक्षात येतं हीची लेव्हल खूपच वरची आहे… हिचे विचार खूपच वरचे आहेत जे आपल्याला न झेपणारे आहेत.. मग तो त्याच्या गृपमधे त्याच्या मित्र मैत्रीणीशी तिच्याबद्दल गॉसीप करायला लागतो.. आणि अरे , तीना अशीच आहे , ती तशीच आहे म्हणजेच काय खरं तर त्याची लायकी नाही पण आपल्यातील कमतरता तो तिला बदनाम करुन भरुन काढायचा प्रयत्न करतो.. किवा त्याचा पुरुषी अहंकार आडवा येतो..

दोन दिवसापुर्वी एका गृपमधे पार्टीला गेले होते.. तिथे हा प्रकार माझ्या कानावर पडला आणि वाईट वाटलं .. मी शक्यतो गेटटुगेदरला जाणं टाळते .. त्या गृप डिस्कशनला डॉक्टर महिला सहभागी होती यासारखे तर दुख नाही.. आपल्याला बोलायला अनेक विषय असतात.. एकत्र येउन आपण समाजासाठी किवा स्वतःसाठी अनेक गोष्टी करु शकतो.. एकमेकांच्या ओळखीचा , माहीतीचा बिझनेस किवा कामासाठी उपयोग करुन घेउ शकतो.. मुळात स्पर्धा ही स्वतःशी असावी आणि गॉसीपींग ऐवजी स्वतःची प्रगती करुन घेण्यात प्रत्येकाने वेळ घालवावा.. अनेक छोटे छोटे कोर्सेस आहेत ते करावेत .. वाचन , व्यायाम ,बागकाम ,छंद जोपासणे हजारो गोष्टी करता येतात पण ही मंडळी आयुष्यातील मौल्यवान वेळ अशा फालतु गोष्टीत वाया घालवतात..

आपण दिलेल्या वेळेचा आपल्याला सदुपयोग करता येणार नसेल तर ती वेळ परत येणार नाही.. त्यामुळे कोणालाही भेटताना त्याची वैचारिक लेव्हल काय आहे हे पहा .. श्रीमंती नाही .. असे ट्रेंड आणि गोल सेट करा की आपलं कर्तृत्व पाहून लोकांनी स्वतःची माफी मागितली पाहिजे..
सोच बदलो.
. देश बदलेगा..

सोनल गोडबोले
लेखिका ,,अभिनेत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *