मन्याड नदीवरील पुलावरून वाहतूक सुरळीत

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील बहादरपूरा गावापासून फुलवळ या गावास जाणाऱ्या रस्त्यावरील मन्याड नदीवरील पुलाचे/रस्त्याचे काम सुरु असल्याने या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध केला होता. काम सुरुअसल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत २७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे दिलेल्या मुदतीत संबंधित ठेकेदाराने जलदगतीने काम दिलेल्या वेळेत काम पूर्ण केले असून ता.२७ नोव्हेंबर रोजी रात्री पासून मन्याड नदीवरील पुलावरून दुचाकी , चारचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे संबंधित ठेकेदार तथा फुलवळ भूमिपुत्र सुनील सादलापुरे यांनी सांगितले आहे.

 

सदर रस्त्याऐवजी बहादरपुरा – घोडज- शेकापुर – बिजेवाडी फाटा- फुलवळ मार्गे मुखेडकडे , जांब-उदगीर ये-जा करण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत यापूर्वी अधिसूचना निर्गमीत केली होती.

 

पुलावरील काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या क्युरिंगसाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगून ता. २७ नोव्हेंबर पर्यंत मुद्गतवाढ देण्यात आली होती. ती मुद्दत संपली असून वाहनधारकांना आता त्या पर्यायी रस्त्याचा अवलंब न करता मन्याड नदीवरील पुलावरून वाहतूक करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *