कंधार ;मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त कंधार तालुक्यात दि.२४/११/२२ ते २६/११/२२ या कालावधीत निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या..
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य सदाशिव आंबटवार यांच्या हस्ते उदघाटन करुन ह्या स्पर्धा संपन्न झाल्या.सतरा केंद्रातुन प्रत्येकी दोन विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेत भाग घेतला.निबंध स्पर्धेत तीन गट समाविष्ट होते ,पहिला गट तिसरी ते पाचवी दुसरा गट सहावी ते आठवी व तिसरा गट नववी ते बारावी तसेच वक्तृत्व स्पर्धेत ही तीन गट पाडले गेले.
निबंध स्पर्धेत गट पहिला मध्ये रुद्रप्रताप विठल चिवडे मनोविकास प्रा.शा.कंधार प्रथम तर दीपक ज्ञानेश्वर गबाळे जि.प.प्रा.शा.नारनाळी हा द्वितीय तर हर्षदीप धम्मानंद जाधव मनोविकास प्रा.शा.कंधार उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त झाले.
गट दुसरा मध्ये रंजना राजेंद्र रायवाडे जि.प.प्रा.शा.नारनाळी प्रथम तर श्रद्धा कालिदास केशे जि.प.प्रा.शा.चिखलभोसी द्वितीय तर माधुरी बळवंत पवळे उत्तेजनार्थ बक्षिस तसेच गट क्र.तीन मधून कल्यानी विलास कौसल्ये समता मा.व उच्च मा.वि.उस्माननगर प्रथम तर करण माधव जिंदमवार महारुद्र मा.वि.मानसपूरी द्वितीय तर प्रियंका परमेश्वर घोरबांड समता मा.व उच्च मा.वि.उस्माननगर उत्तेजनार्थ बक्षिस.तसेच वक्तृत्व स्पर्धेत गट क्रमांक एक मधुन हर्षदीप धम्मानंद जाधव मनोविकास प्रा.वि.कंधार प्रथम तर पांडुरंग बालाजी डावकोरे जि.प.प्रा.शा.चौकी धर्मापूरी द्वितीय गट क्रमांक दोन मधुन अक्षता ज्ञानेश्वर पवार जि.प.प्रा.शा.हटक्याळ प्रथम तर राजश्री प्रकाश बस्वदे जि.प.प्रा.शा.काटकळंबा द्वितीय गट क्रमांक तीन मधुन श्रुती जनार्धन जाधव राजीव गांधी वि.बोळका प्रथम तसेच सानिका रविराज लोखंडे समता वि.उस्माननगर प्रथम(समान गूण) सिमरन काजीम सय्यद जि.प,हा.काटकळंबा द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
पर्यवेक्षक म्हणून मुसा शेख ,हंबिर, एमेकर,ओम येरमे,रविराज केसराळीकर,युसूफ शेख यांनी काम पाहिले.तर केंद्र प्रमुख उल्हास चव्हाण ,रमाकांत कांदे,जयवंत काळे ,उध्दव सूर्यवंशी ,बालाजी कनशेट्टे व गटसाधनकेंद्र येथील विषय सहायक शिवकुमार कनोजवार,सिद्धेश्वर मलगीलवार ,सिद्धोधन गवळे,आनंद तपासे,चाटे,जाधव,स्वामीताई आदींचे सहकार्य लाभले.