नागपूर-
मा.खा.अॅड. बाळासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचे निवेदन मा.जिल्हाधिकारी नागपूर व विभागीय आयुक्त नागपूर यांना भेटून देण्यात आले.
कोविड 19 कोरोना वायरस मुळे सामान्य जनजिवन अस्ताव्यस्त झाले
1.लाकडाऊन झाल्याने अनेकांच्या नौकऱ्या गेल्या व्यवसाय बुडाले अशा लोकांना व्यवसाय उभारणीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे ज्यांच्या कर्जाचे हप्ते स्थगीत झाले त्यांना सुट देवून त्यावर व्याज वाढत दंड आकारु नये.
2.विजबिलात आकारण्यात येणारा स्थिर व वहन कर सरसकट माफ करावा
3.सर्दी,खोकला,ताप या सामान्यतः आजारांवर स्थानीक खाजगी डॉक्टर हाॅस्पीटल यांना उपचार करण्याची परवानगी द्यावी
4. मान्यताप्राप्त मेडिकल स्टोर्सना सर्दी,खोकला,ताप या सामान्य आजारांवरील औषधी विना प्रेस्क्रीपशन मीळावी
5. मालमत्ता कर पाणीकरावरील दंड शास्त्री सरसकट माफ करावी व 2020-21 चा कर माफ करावा
6. लाकडाऊनची संपूर्ण बंदी उठवावी दुःखाचे,अस्थापणे रात्री 9.00 पर्यत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावीअशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले,
याप्रसंगी फोरमचे केंद्रीय संघटक भूषण भस्मे,राजेश भंडारे,अजय ढोणे, गौतम मेश्राम, राहुल गायकवाड,विजय पाटील,प्रभाकर रंगारी व भीमराव हाडके साहेब उपस्थित होते