लोहा ; विनोद महाबळे
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढते रुग्ण पाहून त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून नपा प्रशासनाने शुक्रवार ते मंगळवार पर्यंत टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे पण आ . श्यामसुंदर शिंदे यांनी बंद ला जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने कोणीही आपली दुकाने बंद करू नये असे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे यामुळे बंद आहे की या सम्रमात नागरिक असल्याचे जाणवत आहे .
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ नये म्हणून 22 मार्च पासून देशात व राज्यात टाळेबंदीचा निर्णय घेतला होता पण आत्ताकेंद्र व राज्यशासन टप्याटप्याने टाळेबंदी उठवत असतांनाच लोहा शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून नपाने पुढील पाच दिवस ताळेबंदीचा निर्णय घेतला आहे
. मागील मार्च महिन्या पासून बंद असल्यामुळे लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून अनेकांचे व्यापार कायमचे बंद झाले आहेत अश्यातच अचानक नपाने पाच दिवस टाळेबंदीचा निर्णय घेतल्या मुळे त्याचे लाखोंचे नुकसान होणार आहे .
सदरील नपाने घाई गडबडीत घेतलेला ताळेबंदीचा निर्णय हा चुकीचा असून त्याला जिल्हाधिकारी यांची परवानगी नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत कोणीही आपली दुकाने बंद करूनये असे अवाहन केले आहे यामुळे बंद आहे की नाही हे जनतेला कळत नसून आज शहरातील काही दुकाने बंद तर काही दुकाने नपाने घेतलेल्या निर्णया विरोधात जाऊन चालू होती.
एकंदरीत पाहता लोहा बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.