नांदेड : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो सातत्याने समाज घडवण्याचा प्रयत्न करत असतो . बातमीचा पाठलाग करत असताना सातत्याने त्याची धावपळ होत असते. प्रचंड परिश्रम करावे लागतात .त्यामुळे समाज घडवत असताना पत्रकार स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत . परिणामी अनेक वेळा पत्रकारांच्या जीवनातही आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. त्यातून आर्थिक आणि मानसिक कोंडी होत असते . त्यामुळे पत्रकारांनी समाज घडवत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या रोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद,मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्हा मराठी पञकार संघ नांदेड व महानगरपालिका,नांदेडच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३ डिसेंबर रोजी आयोजित जंगमवाडी,नांदेड येथिल महानगरपालिका दवाखान्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबीराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी व मनपा आयुक्त डाॅ.सुनिल लहाने,पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती तर,परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी,माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकार आरोग्य शिबीराबाबतची भूमिका विषद केली. सुत्रसंचालन पत्रकार राम तरटे यांनी तर,उपस्थितांचे आभार माजी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे यांनी मानले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेश बिसेन, डाॅ.बळीराम भुरके , डॉ. राजेश तोष्णीवाल, डॉ. बदियोद्दीन, डॉक्टर विनोद चव्हाण , डॉक्टर काझीम ,डॉक्टर जिलानी, डॉक्टर हनुमंत रिठे, डॉक्टर गजानन शेंडे, डॉ. नुसरत जिल्हानी, वैशाली पाटील ,स्वाती सरोदे ,हेमराज वाघमारे, सुरज वाघमारे ,मयूर पारिख , प्रवीण अलकटवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेत आरोग्य शिबीरात सहभागी पत्रकारांची रक्तचाचणी,नेत्र,दंत,कान-नाक- घसा,त्वचा आदी तपासण्या केल्या.
या शिबीराचा पञकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे,गोविंद उबाळे, माजी जिल्हा समन्वयक कृष्णा उमरीकर,नरेश दंडवते,राजू गिरी,योगेश लाठकर,सुधीर प्रधान,रविंद्र कुलकर्णी,गोविंद करवा,पंढरीनाथ बोकारे,प्रदिप लोखंडे,महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख,महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार,सुनिल पारडे, श्री.आणि सौ.किशोर वागदरीकर,गजानन कानडे, प्रल्हाद कांबळे,प्रशांत गवळे, भुषण पारळकर,किरण कुलकर्णी,नरेश तुप्तेवार, सुर्यकुमार यन्नावार,प्रदिप घुगे,मिर्झा बेग,श्रीराम मोटरगे, श्रीधर नागापूरकर, छायाचिञकार ज्ञानेश्वर सुनेगांवकर,करणसिंह बैस,नरेंद्र गडप्पा तसेच,मराठी पञकार परिषद मुंबई आणि नांदेड जिल्हा व महानगर महानगर मराठी पत्रकार संघांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शहरातील पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान यावेळी पुढे बोलताना आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आरोग्याकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे याची अनेक उदाहरणे दिली आपण शारीरिक दृष्ट्या बाह्य अंगाने तंदुरुस्त वाटत असलो तरी शरीरातील अनेक अवयव हे खराब झालेले असतात ज्याची जाणीव आपल्याला होत नाही परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या जीवावर बेतू शकते अशा वेळेस दक्षता घेऊन प्रत्येकाने आवश्यक असणाऱ्या आरोग्याच्या सर्व तपासण्या करून घेणे स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी ही महत्त्वपूर्ण आहे महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पत्रकार पोलीस आणि समाजाचे आरोग्यासाठी सदैव काम करत राहील भविष्यातही असे शिबिर आपण आयोजित करावेत आम्ही त्याला संपूर्णतः सहकार्य करू असा विश्वास आहे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी यावेळी व्यक्त केला.
अध्यक्षिय समारोप करताना मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी म्हणाले की, जिल्हा मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेले पत्रकारांसाठीचे आरोग्य शिबिर हे कौतुकास्पद आहे. पत्रकारांसाठी आरोग्य तपासणीची मोठी संधी उपलब्ध करून दिली. भविष्यातही अशा तपासण्याबाबत जिल्हा पत्रकार संघाने शिबिर घ्यावीत असे सांगतानाच पत्रकाराने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी ,आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ भक्कम असावा : पोलीस अधीक्षक कोकाटे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो भक्कम आणि सक्षम असला पाहिजे. हा आधारस्तंभ भक्कम आणि सक्षम असण्यासाठी तो तंदुरुस्त असला पाहिजे आणि ही तंदुरुस्ती टिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे वैयक्तिक लक्ष दिले पाहिजे . अलीकडच्या बातमी सर्वप्रथम देण्याच्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो ज्याचे परिणाम आपल्या आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे पत्रकारांनी आपले आरोग्य उत्तम ठेवावे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ भक्कम करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.