आज लोहा तालुक्यातील वाळकेवाडी येथील शेतकरी श्री वैजनाथआप्पा महागावकर यांचे शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे सदरील शेतकऱ्यांच्या जळालेल्या घराची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली
तसेच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याचे आश्वासन दिले यावेळी राज्य प्रवक्ते फारूक अहेमदसर, राज्य उपाध्यक्ष श्री प्रा.गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरगंले , युवा नेते दत्ताभाऊ शेटे तालुका अध्यक्ष सतीश आनेराव, लोकनियुक्त सरपंच श्री पांडूरंग पाटील, उपसरपंच विष्णुकांत देशमुख, सुमित पवार व गावकरी उपस्थित होते .