कोराजीन आणि ट्रेसर ही किटकनाशक मानवी जीवीतास घातक आहेत. कोराजीन हे किटकनाशक फवारल्या शिवाय फुलगोबी पिकावरील आळी नियंत्रित होत नाही. कोबीवरील आळी नियंत्रित करण्यासाठी बहूतेक शेतकरी फुलकोबी या पिकावर कोराजीन ची फवारणी करत आहोत. तर वांग्यासाठी ट्रेसर या किटक नाशकाची फवारणी करण्यात येत आहे. अशी माहिती भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडूनच आम्हाला मिळाली आहे.
कोराजीन किटकनाशकाची एकदा फवारणी केली, की ६५ दिवस पुन्हा त्या पिकावर आळी / किडे याचा प्रादुर्भाव होत नाही. असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच त्या पिकावर हे विषारी औषध टिकुण राहते. तसेच वांग्यावर ट्रेसर नावाचे किटकनाशक ची फवारणी करावी लागते. ट्रेसर किटकनाशक ३० दिवस अॅक्टीव्ह राहते. एकदा फवारणी केली की किडी किंवा आळी वांग्याकडे पुन्हा फिरकत नाही. या काळात आलेले वाग्यांचे उत्पादन बाजारात विक्रीसाठी येते, ते टवटवीत दिसते. या भाज्यांवर आळीने डंक मारलेला तुम्हाला दिसनार नाही. त्यामुळे नजरेला दिसताच क्षणी त्या खरेदी करायला भूरळ पाडतात. परंतू ह्या भाज्या तुमच्या घरात अनेक आजार घेऊन येत आहेत. यातूनच मनाची सहनशिलता संपत आहे. चिडचिडेपणा वाढत आहे. थोड्या थोड्या कारणावरून भांडने होतात. शरिरातील युम्यूनिटी कमी होत जात आहे. कर्करोग, बीपी, हायपर टेन्शन वाढत आहेत. असा संशोधकाचा दावा आहे. त्यांचे हे मत लक्षात घेतले पाहिजेत, तेंव्हा फुलगोबी /वांगी खाने टाळणेच गरजेचे आहे.
रानभाज्यांचा उत्तम उपयोग करून घेतला पाहिजे, कारण रानभाजीवर किटकनाशक फवारणी फारशी कुणी करत नाहीत. त्यामुळे धोका कमी आहे. या हंगामात राणभाज्या मिळत नसतील तर हरबरा, करडई, राई यांच्या पालेभाज्या ताटात घ्यायला हरकत नाही. या भाज्या पेरणीनंतर लवकर येतात. शिवाय यावर ऐवढे खर्चीक किटकनाशक सहजासहजी फवारले जात नाहीत. हा एक रानभाजी खान्यात फायदा आहे. तेंव्हा दिर्घ आयूष्यी होण्यासाठी सतत संघर्ष करा असेच आवाहन या पोस्टव्दारे करू इच्छितो.