कंधारच्या आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा प्रतिसाद ; 67 पत्रकारांची झाली आरोग्य तपासणी

 

कंधार, (वार्ताहर ) दि.3 मराठी पत्रकार परिषदेच्या 84 व्या वर्धापन दिना निमित्त कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात कंधार शहर व ग्रामीण भागातील 67 पत्रकारांची तपासणी करण्यात आली. 

                              3 डिसेंबर हा दिवस राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्वच पत्रकारांच्या व कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीसाठी कंधार ग्रामीण रुग्णालयात शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी दहा वाजता.आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिराचे उदघाटन कंधारचे पोलीस निरीक्षक राम पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेश पाठक, डॉ.राजीव टोम्पे, डॉ.सुधाकर तहाडे, डॉ.गजानन आंबेकर, डॉ.महेश पोकले, डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे, डॉ.संतोष पदमवार, डॉ.श्रीकांत मोरे, डॉ.शाहीन मॅडम, डॉ.अरुण राठोड, डॉ.नम्रता ढोणे, डॉ.गजानन पवार, जेष्ठ पत्रकार रमेशसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत होती.

                       यावेळी सर्वप्रथम दर्पणकार, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवारांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करतांना पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर म्हणाले, 1939 साली स्थापना झालेली मराठी पत्रकार परिषद नेहमी सामाजिक उपक्रम राबवित असते, परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस. एम.देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही देखील  असेच कार्य करीत आहोत. तसेच तालुक्यात प्रथमच पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजण करण्यात आल्याचे ही ठाकूर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उदघाटक पोलीस निरीक्षक राम पडवळ म्हणाले की, समाजात पत्रकारांचे कार्य मोलाचे आहे. एखादी गोष्ट चुकत असेल तर मला पण त्याची भीती असली पाहिजे, चांगले काम केले तर तेदेखील दाखवायला पाहिजे.पत्रकार दोन्ही गोष्टी दाखवतात.आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःची काळजी स्वतःचं घेतली पाहिजे. त्यामुळे पत्रकार संघाने तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे, असेच उपक्रम पत्रकार संघाने नेहमी राबववेत असे ते म्हणाले. यावेळी डॉ.टोम्पे यांनी हा उपक्रम वर्षातून दोन वेळा घेतला जावा असे ते म्हणाले. 

              या शिबिराच्या यशस्वीते साठी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर, सचिव हाफिज घडीवाला, कार्याध्यक्ष एन.डी.जाभाडे, कोषाध्यक्ष महंमद अन्सारोद्दीन, सहसचिव गंगाप्रसाद यन्नावार,विठ्ठल कतरे, सत्यनारायण मानसपुरे, दयानंद कदम, संभाजी कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गंगाप्रसाद यन्नावार यांनी केले तर शेवटी आभार विश्वभर बसवंते यांनी मानले.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *