फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
१९९२ पासून ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्याची संयुक्त राष्ट्र संघाने सुरुवात केली , त्यानुसार दरवर्षी सर्वत्र हा जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो , त्याच अनुषंगाने फुलवळ येथेही तो साजरा करण्यात आला आणि येथील उपस्थित सर्व दिव्यांगांचा ग्रामपंचायत कार्यालय फुलवळ तसेच माजी सरपंच बालाजी देवकांबळे च्या वतीने वयक्तिक गौरव करण्यात आला.
सरपंच विमलबाई नागनाथ मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव तथा ग्रामविकास अधिकारी आमृत मंगनाळे तसेच ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ता.३ डिसेंबर रोजी फुलवळ ग्राम पंचायत च्या वतीने दिव्यांग बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे आश्वासन देत त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य चंदबस मंगनाळे , बालाजी देवकांबळे , प्रवीण मंगनाळे , रहीम शेख सह ग्राम पंचायत चे सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ , दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर माजी सरपंच तथा ग्राम पंचायत चे विद्यमान सदस्य बालाजी देवकांबळे यांनीही सागर मल्टिसेर्व्हिसेस येथे विशेष कार्यक्रम घेवुन उपस्थित सर्व दिव्यांगांचा पुष्पहार व मिठाई देऊन गौरव केला. यावेळी ते म्हणाले की गेल्या पंचवार्षिक म्हणजे च मी सरपंच असतांना पासून दिव्यांग दिनी या सोहळ्याचे आयोजन करत आलोय आणि भविष्यात ही दिव्यांग बांधवांच्या प्रत्येक अडीअडचणीत मी सदैव पुढाकार घेऊन मदतीचा हात देत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ग्राम पंचायतकडे दिव्यांग बांधवांना हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून त्यांना एक सभागृह उभारणीसाठी ग्राम पंचायत ने जागेची तरतूद व निधीची तरतूद करावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य बालाजी देवकांबळे यांनी ग्राम पंचायत कडे मागणी केली ,
त्याअनुषंगाने लवकरच आम्ही त्यासंदर्भात बैठक घेऊन कार्यवाही करू आणि दिव्यांगांच्या मदतीसाठी तत्पर असून त्यांच्यासाठी सकारात्मक विचार ठेवून नक्कीच मदतीचा हात देऊ असे आश्वासन ही सरपंच विमलबाई मंगनाळे यांनी दिले.