1) कंधार :- दिनांक 01.12.2022 रोजी 20.00 वा. चे सुमारास, बालाजी दादाराव केंद्रे यांचे शेततळयातील विहीरीमध्ये मौ. रेखातांडा शिवारात ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील मयत नामे लक्ष्मण पांडुरंग राठोड, वय 48 वर्षे, रा. रेखानाईक तांडा ता. कंधार जि. नांदेड यास यातील नमुद आरोपीने मयतास त्याचे घरून जबरदस्तीने नेऊन त्यास बालाजी दादाराव केंद्रे यांचे शेत तळ्यातील विहीरीजवळ घेऊन जाऊन मागील आठ दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यास पोहता येत नसल्यामुळे त्यास विहीरीत ढकलुन खुन केला.
वगैरे वरून सदर प्रकरणात यापुर्वी आ. मृ. न. 65 / 2022 दाखल झाला होता. वगैरे फिर्यादी पांडुरंग रेखा राठोड, वय 68 वर्षे, व्यवसाय शेती रा. रेखानाईक तांडा ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरन 369/2022 कलम 302, भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री लोणीकर, मो.नं. 9422336474 हे करीत आहेत.