कंधार तालुक्यातील बिजेवाडी येथे१२ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू . प्रेत काढण्यासाठी प्रशासनाची धावाधाव………! खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यंत्रणा आली कामाला.

कंधार : प्रतिनिधी 

तालुक्यातील बिजेवाडी शिवारात ऊस तोडणी साठी आलेल्या ऊसतोड कामगाराच्या दोन मुली आपल्या राहूटी च्या बाजूलाच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. एका मुलीचा पाय घसरून विहिरीत पडली तर सोबत असलेल्या चिमुकलीने आरडाओरडा करत तिला हाताला धरून बाहेर काढत असताना ती ही विहिरीत पडली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आवाज ऐकून एका मुलीला वाचवले. दुसरी मुलगी खोल पाण्यात बुडाल्यामुळे तिला वाचवण्यास अपयश आले.मयत मुलीला काढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले होते परंतु तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे विहिरीतील पाणी कमी होत नव्हते .ही बाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दुसरी यंत्रणा कामाला लावली आणि प्रेत काढण्यास यश आले.

पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी विंचवाच बिऱ्हाड पाठीवर घेतल्यागत पालम तालुक्यातील फूट तलाव तांडा येथील श्रीकांत राठोड व यशोदा राठोड हे दाम्पत्य गेल्या महिन्याभरापासून ऊस तोडणी कामासाठी कंधार तालुक्यातील बिजेवाडी शिवारात राहुटी (झोपडी) घालून स्थायिक झाले होते. त्यांच्या झोपडी पासून १०० ते १५० मीटर अंतरावर शेत सर्व्हे नंबर ५१/३ मध्ये पाण्याने तुडुंब भरलेली एक विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा वापर धूनी-भांडी करण्यासाठी ही चिमुकली पाणी आणण्यासाठी दैनंदिन जात होती.रोजच्या प्रमाणे गुरुवारी दि.१ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता चे सुमारास कु.कोमल श्रीकांत राठोड वय १२ वर्षे व कु.पल्लवी श्रीकांत राठोड व ५ वर्ष या सख्ख्या बहिणी पाणी आणण्यासाठी विहिरीकडे गेल्या होत्या . पाणी काढण्याच्या नादात असताना कोमलचा पाय घसरून विहिरीत पडली. जवळच असलेली पल्लवी ही आरडाओरडा करत कोमलच्या हाताला धरण्याचा प्रयत्न करत असताना तिचाही तोल जाऊन पाण्यात पडली . गटांगळ्या खात असताना बाजूच्या शेतकऱ्यास कसला तरी आवाज येत असल्याने त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. कोमल पाण्यात पूर्णता बुडाली होती तर पल्लवी पाण्यात दिसत असताना शेतकरी अशोक परसराम डांगे यांनी भेंडीच्या धाटाच्या साहाय्याने पल्लवीला बाहेर काढून वाचविण्यात यश मिळवले तर कु.कोमल हिला वाचवीण्यात अपयश आले.

विहीर नदीकाठी असल्याने या विहिरीला मोठे मोठे झरे आहेत त्यामुळे मयत कोमल हिचे प्रेत काढण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. प्रशासनाने विहिरीतील पाणी काढण्यासाठी चार-पाच जनरेटर आणले परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही जनरेटर चालत नसल्याने विहिरीचे पाणी काढणे अशक्य झाले होते. ही बाब भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संपर्क करून सविस्तर सांगितली असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग च्या कामावरील मोठे जनरेटर उपलब्ध करुन दिले . या जनरेटरच्या मदतीने मोटारी लावून विहिरीतील पाणी काढण्यास मदत झाली व तब्बल 30 तासानंतर मयत कोमलीचे प्रत काढण्यात प्रशासनाला यश आले.मंडळ अधिकारी सुजलेगावकर, सी.एन.महाजन, तलाठी मद्देवाड, नारमवाड पो.हे.कॉ. सा.न.प. पो.कॉ. केंद्रे हे परिश्रम घेत.तर श्रीराम जाधव, लक्ष्मणराव जाधव,सुरेश राठोड, विश्वनाथ पवार ,राजीव डांगे,व्यंकट राठोड,सुभाष राठोड,मनोहर लुंगारे, यांच्यासह भोजू तांडा खेमा तांडा आणि बिजेवाडी परिसरातले नागरिक तीस तसं प्रशासनाला मदत करत होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *