कंधार, (प्रतीनीधी)-
हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिना निमित्ताने गेल्या चार वर्षापासुन कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठाण च्या वतिने पत्रकारांना पुरस्कार देवून गौरव केला जातो. राज्यासह नांदेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहुर, उमरी, मुदखेड, भोकर, अर्धापुर, धर्माबाद, बिलोली, नायगाव, देगलुर, मुखेड, कंधार, लोहा या १६ तालुक्यात प्रत्येकी एका पत्रकारास पुरस्कार देवून गौरव करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे.
सन 2022 च्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी अर्ज व बातमीचे कात्रणसह प्रस्ताव दिनांक 28 डिसेंबर 2022 पर्यंत पाठवण्यात यावे.
हिंदवी बाणा लाईव्ह च्या पाचव्या वर्धापण दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे या हेतुन गेल्या चार वर्षापासुन पत्रकारांना पुरस्कार देवून गौरव केला जातो.गेल्यावर्षी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजप गटनेते एकनाथ पवार, लोकशाही न्यूजचे वृतनिवेदक ऋषीदेसाई यांच्या हस्ते पुरस्कार देवून पत्रकारांचा गौरव केला .
पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे हाच या प्रतिष्ठाणचा मुख्ये उद्देश आहे. हा पुरस्कार शिफारस किंवा ओळख पाहुन नाही तर त्यांच्या कार्यावर व लिखानावर दिल्या जातो. त्यामुळे नांदेड जिल्हातील १६ तालुक्यातील पत्रकार बांधवानी दि. 28 डिसेंबर पर्यंत आपला प्रस्ताव व बातमीचे कात्रण , आपला बायोडाट खालील whatsapp नंबरवर पाठवावे. संपादक माधव भालेराव- ९४२०३१२२४२ मिर्जा जमीर बेग ९९७५९ ६७९००, दिगांबर वाघामारे ९८६०८०९८९४ ,मोहमद सिंकदर ९९६०४३४६५९ , एस.पी.केंद्रे ९७६६२३५१०४ , प्रा . भागवत गोरे ७५०७५९९७५३ , प्रा .सुभाष वाघमारे ९९२३९७१४०१ या whatsapp नंबर वर पाठवावा.