कंधार तालुक्यातील मतदान प्रक्रिया अनुपसिंह यादव परिक्षार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली. कंधार तालुक्याचे सरासरी सुमारे ८१ टक्के एवढे मतदान झाले .
कंधार तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया ३६ मतदान केंद्रावर पार पडली , एकुण १२ हजार सातशे तेविस पैकी १० हजार तिनशे त्र्यांनो एवढे मतदान झाल्याने शेकडा ८१ टक्के मतदान झाले .
सर्वाधिक सरासरी जास्ती चे मतदान चौकी धर्मापूरी येथे ९३ टक्के तर सरासरी सर्वांत कमी मतदान दिग्रस ( बु .) ग्रामपंचायतीचे सुमारे ६३ टक्के एवढे झाले .
निवडणूक प्रक्रिया यशस्वी पूर्ण होण्यासाठी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार कंधार अनुपसिंह अरुणकुमार यादव यांनी ठिकठिकाणी मनदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून भेटी दिल्या .
तालुक्यातील इमामवाडी उमरज , मानसपुरी , कोटबाजार या मतदान केंद्रांवर भेटी देवून पाहणी केली . तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती .
यासाठी नायब तहसीलदार नयना कुलकर्णी,संतोष कामठेकर प्रतिक जोंधळे, मन्मथ थोटे सर्व तलाठी व मंडळधिकारी मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी व तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
उद्या दि २० रोजी मतमोजणी असल्याने सर्व तयारी झाली असल्याचे प्रशासनाच्य वतीने कळविण्यात आले .