तालुक्यातील रहाटी येथे 96 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन काल सोमवार दि.19 रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पाणीपुरवठा विहीर आणि पाणी पुरवठा टाकीच्या कामाचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले ,यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी बोलताना आशाताई म्हणाल्या की, लोहा कंधार मतदार संघात प्रत्येक गाव वाडी तांड्यावर पाणीपुरवठा योजना ही सर्व नागरिकांची मूलभूत गरज असून प्रत्येक गावात विविध विकास कामे मंजूर झाल्यानंतर त्या कामाची गावकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून कामे दर्जेदार करावीत व गावातील पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आशाताई बोलताना म्हणाल्या, रहाटी गावासाठी अंतर्गत विकासकामांसाठी 33 लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे व लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून लोहा कंधार मतदार संघातील प्रत्येक गाव वाडी तांड्यावर स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी विकास निधीची कदापी कमतरता भासणार नसल्याचे आशाताई यांनी बोलताना सांगितले, याप्रसंगी शिरर्शीचे सरपंच मनोहर पाटील, गोणार सरपंच हरी पाटील, मगनाळी सरपंच पिंटू अभंगे,नारनाळी सरपंच भुजंग देवहारे, मादाळी सरपंच अशोक पाटील, राहाटी सरपंच नीळकंठ कौसल्ये,दत्ता पाटील राहटीकर,सतीश पाटील कराळे, गंगाधर पाटील चिखलीकर, ओम लाला ठाकूर,एकनाथ टोम्पे,गोविंद कौसल्ये,माजी सरपंच शिवाजी पाटील,पोलीस पाटील माधव कौसल्ये,पाणीपुरवठा अभियंता श्रीराम डीकळे सह कार्यकर्ते पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.