आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते खंडोबारायाच्या पालखीचे स्वागत व पूजन
लोहा/ प्रतिनिधी
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबारायाच्या यात्रेस काल दिनांक २२ डिसेंबर रोज गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला असून लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे ,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ते सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, शेकापचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे यांनी श्री. क्षेत्र खंडोबा रायाच्या मंदिरात जाऊन खंडोबा रायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले, यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघातील सर्व तमाम मायबाप जनतेस सुख समृद्धी निरोगी आयुष्यासह शेतकरी कष्टकऱ्यांना व मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी व मतदार संघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आशीर्वाद देण्याचे साकडे आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी खंडोबारायांना घातले, यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी सभापती बालाजीराव वैजाळे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार , माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगंडे, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर तिडके, बोरगावचे सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर प्रमुख उपस्थित होते, यानंतर दुपारी श्री. क्षेत्र खंडोबा रायाची मानाची पालखी शासकीय विश्रामगृह माळेगाव येथे उत्साहात व भक्तिमय वातावरणात दाखल झाली यावेळी श्री. खंडोबारायाच्या पालखीचे दर्शन व पूजन लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे चंद्रसेन पाटील यांनी पूजन करून स्वागत केले, यावेळी श्री क्षेत्र खंडेरायाच्या प्रमुख मानकरी यांचा सत्कार आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबा कले, उपस्थित होते, रिसनगाव चे मानाचे प्रमुख मानकरी यांचा सत्कार व रोख 1 लाख 11 हजार रुपये व शाल श्रीफळ देऊन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सत्कार केला व इतर मानकरी नागेश महाजन, व्यंकटराव पांडागळे ,खुशालराव भोसीकर, गोविंदराव नाईकवाडे, पांडुरंग पाटील, रावसाहेब पाटील या मानकरी यांना प्रत्येकी 21 हजार व शाल श्रीफळ देऊन आमदार शिंदे यांच्या हस्ते या मानकरी यांचा सत्कार करण्यात आला.
*आमदार शिंदे यांच्या प्रयत्नाने मानकरी यांच्या मानधनात वाढ*
कोरोनाच्या गंभीर संकटात गेली दोन वर्षे यात्रा होऊ शकली नसून यावर्षी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत माळेगाव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असून श्रीक्षेत्र खंडोबा रायांच्या मानाच्या प्रमुख मानकरी यांना व इतर मानकरी यांच्या मानधनात या अगोदर वाढ करण्यात आली नव्हती पण लोहा कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी श्रीक्षेत्र खंडेरायाच्या मानकर यांच्या मानधनात वाढ करावी म्हणून वेळोवेळी प्रयत्न केले असता यावर्षी प्रमुख मानाच्या मानकरी व इतर मानकरी यांच्या मानधनात आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रशासनाने वाढ केल्याने यावर्षी मानाच्या रिसनगाव येथील मानाच्या मानकरी यांना रोख एक लाख 11 हजार रुपये शाल श्रीफळ व इतर सात मानकरी यांना प्रत्येकी 21 हजार रुपये रोख व शाल श्रीफळ देऊन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते या मानकरी यांचा सन्मान व गौरव करण्यात आल्याने मानाच्या मानकरी यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व आभार मानले.
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेस आज उत्साहात प्रारंभ झाला असून या यात्रेत देशातील विविध प्रांतातील भाविक भक्त व व्यापारी लाखोंच्या संख्येने यात्रेत भक्तिमय वातावरणात वातावरणात दाखल होतात यामुळे या यात्रेला अधिक अधिक वैभव प्राप्त होण्यासाठी व येणाऱ्या काळात यात्रेतील मूलभूत विकास कामासाठी मी येणाऱ्या काळात भरीव निधी उपलब्ध करून देणार असून श्री क्षेत्र खंडेरायांच्या यात्रेचा देशभरामध्ये नावलौकिक व वैभव वाढवण्यासाठी मी या भागाचा आमदार म्हणून सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.