कंधार : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सात विध्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असुन त्या सात विध्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
जिल्हा पातळीवर झालेल्या क्रीडा स्पर्धेत थाळी फेक मध्ये कु. माधवी कु. भोसीकर हिने प्रथम क्रमांक तर जानवी भुजबळ हिने ट्रिपल जंप मध्ये प्रथम क्रमांक, महेश गीते लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक व ट्रिपल जंप मध्ये द्वितीय क्रमांक, सुभाष केंद्रे याने थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक, हेमराज यादव जुडो कराटे मध्ये प्रथम क्रमांक, गौरी संगम नागठाणे किक बॉक्सिंग मध्ये प्रथम क्रमांक, तनुजा गीते लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवत एन. एस. बी. च्या विध्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धे पर्यंत मजल मारली आहे.
विध्यार्थ्यांच्या या यशा बदल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष महेश भोसीकर, उपमुख्याध्यापक मोहम्मद फैसलुद्दीन, क्रीडा शिक्षक विजय कदम, प्राध्यापक विश्र्वनाथ दिग्रसकर, पर्यवेक्षक सूर्यवंशी, उमाकांत वाखरडकर, शंकर गीते तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.