कंधार ;ऐतिहासिक राष्ट्रकूटाचे ऐश्वर्य लाभलेल्या कंधार नगरीतील कंधार आगार दरवर्षीच यात्रेकरूंच्या सेवेसाठी तत्पर असते.यंदाही स्वतंत्र कक्ष तयार करुन ध्वनीक्षध्वािक्षेपक करुन यात्रेकरुंना एस.टी महामंडळाची सोय आपल्या सेवेत फलाटावर लागलेली गाडी क्रमांक सांगून प्रवाश्यांची सोय करतात.
कडाक्याच्या माळेगावच्या गुलाबी थंडीत यात्रेकरुंना खंडोबाची गाणी, मराठमोळी लावणी गीताने मोहित करुन शिवा मल्हारी येळकोट-येळकोट घे म्हणत प्रवाश्यांच्या सेवेसाठी सदा तत्पर कंधार आगारातील सर्व सेवाचार्य! त्यात
कंधार आगार प्रमुख अशोक चव्हाण , चिवडे एन.व्ही, शेख एफ.एम.,एकलारे बी.एस.,एम.बी गारोळे आदीजण यात्रेकरुंच्या सेवेत दिवस-रात्र सेवेस कटिबद्ध असतात. या सर्व कंधार आगारात सेवाचार्यांना यात्रेकरु धन्यवाद देत आहेत.