कंधार शहर कचरा मुक्त करा – ‘आपची ‘ पालीका मुख्याधिकारी यांना मागणी

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील विविध रोडवरती कचऱ्याचे ढीग जशास तसे असतात.
आपली नगरपालिका याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे.
काही ठिकाणी घंटागाडी जाते तर काही ठिकाणी जात नाही त्यामुळे तेथील रहिवासी कचरा सार्वजनिक जागेवर टाकून जातात त्यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार होत आहे.

त्यामुळे डास , घाण परिसरामध्ये पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
आपण याकडे तातडीने लक्ष देऊन कंधार शहरांमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवून कंधार शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलावीत अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल असे निवेदन मुख्याधिकारी ,
नगरपरिषद कार्यालय,कंधार
यांना देण्यात आले .

कंधार शहरातील कचऱ्याचे ठिकाण –
१) मनोविकास प्राथमिक शाळा समोर (२) प्रियदर्शनी शाळेसमोर (३) सिनेमा टॉकीजचा उतार (४) माईचे मंदिर साठे नगर समोर (५) गरुडकर गल्ली समोर मेन रोड (६) साठे नगर मिल समोर (७) गवंडी पार्क परिसरात (८) गायकवाड गल्ली (९) प्रियदर्शनी नगर झेंड्याजवळ (१०) प्रियदर्शनी नगर स्वच्छतागृहाच्या परिसरासह कंधार शहर कचरा मुक्त करावे अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली .
या निवेदनावर साईनाथ मळगे , महेश बडवणे
,संदिप ईश्वरराम , कैलास गोपाळराव ,शनिठकर गोविंद नेवल , नागेश बालाजीराव कउटकर -राजु मळगे , पिंटू , नंदकिशोर भिसे ,अविनाश शिवाजी फुले , संदिप संजय मोरे ,ओम गायकवाड ,व्यंकटेश फुले आदीसह कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *