शुभम परांडे हा चार दिवसांपासून घरून बेपत्ता , पोलीस तपासकार्य सुरू.


फुलवळ बातमीदार (धोंडीबा बोरगावे )

         शुभम दत्ता परांडे वय १३ वर्ष हा मुलगा ता. २६ ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे ९:३० ते १० वाजेच्या दरम्यान राहत्या घरून निघून गेला असून आज चार दिवस झाले तरीही त्याचा अद्याप कसलाच शोध लागला नसून कंधार पोलिसांकडून तपासकार्य चालूच असल्याचे सांगण्यात आले.
            दत्ता परांडे हे मूळचे कंधार तालुक्यातील मोहिजा येथील रहिवासी , परंतु सध्या ते कंधार येथील शहाजी नगर भागात वास्तव्यास आहेत. ता. २६ ऑगस्ट रोजी दत्ता परांडे हे आपला मुलगा शुभम परांडे याला कंधार च्या घरीच ठेवून ते स्वतः आणि त्यांची पत्नी म्हणजे शुभम ची आई आणि त्याचा छोटा भाऊ हे तिघेजण महालक्ष्मी सणानिमित्त मोहिजा या गावाकडे गेले होते. त्याच दिवशी शुभम परांडे हा रात्री च्या वेळी कपडे घेऊन घराबाहेर पडला असून त्या दिवसापासून आजपर्यंत तो घरी परतला नसल्याने तसे कंधार पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी कळवले आहे. 
    शुभम हा येथीलच श्री शिवाजी हायस्कूल शाळेत वर्ग आठवीत शिकत आहे. बाकी वर्णन रंग सावळा , उंची ५ फूट , बांधा मध्यम असून त्या दिवशी त्याच्या अंगावर लाल रंगाचा टीशर्ट व जिन्स पॅन्ट होती.
       कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. वसंत राठोड हे तपास करत असून जर वरील वर्णनाचा मुलगा कोणाला कुठे आढळून आला तर कंधार पोलीस ठाण्यात खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पो. नि. मो. नं. ८३२९७००१३६ , पो. ना. राठोड मो . नं. ९०११७३६८८९ , कार्यालय नं. ०२४६६२२३४३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *