कंधार : सय्यद हबीब
सर्व मंदिर, प्रार्थना स्थळ, पुजा प्रार्थनेसाठी खुले करण्यात यावेत या मागणीसाठी कंधार तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवेवरच्या गणपती मंदिरात २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही असे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी सांगितले.
ठाकरे सरकारला इशारा देण्याकरिता व देवस्थाने सुरु करा या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत “घंटानाद आंदोलन” करण्यात आले आहे यावेळी भाजपा नेते देवीदास राठोड, महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्ररेखा ताई गोरे, मधुकर डांगे, निलेश गौर, श्रीराम जाधव, राजहंश शहापुरे ,शंतनु कैलासे, बालाजी तोटावाड, माऊली मुंडे, अविनाश गित्ते, सागर डोंगरजकर सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.