ऑनलाइन फसवणूकीचा धडा


पूर्वीच्या काळी दरोडे टाकून लुटणारी दरोडेखोरांची टोळी नामशेष होऊन ती आता हायटेक होऊन घरबसल्या संपत्ती लुटणारी सायबर दरोडेखोरांची नवी जमात ऑनलाईन पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जन्माला येत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर जितका वाढला आहे त्याच पद्धतीने त्याचा गैरवापरही होत आहे. यात शिक्षित असलेल्या धनवान व्यक्तीच बळी पडत आहेत. महाराष्ट्रात जानेवारी ते मे २०२० या कालावधीत महाराष्ट्रात जवळपास २२३५ऑ नलाईन दरोडे टाकण्यात आले आहेत. विविध फंडे वापरुन ऑनलाईन पद्धतीने पैसे देण्याच्या अॅपद्वारे देश विदेशातून ज्येष्ठ तथा सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांवर दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे सद्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी नागरिक धजावत नाहीत. या प्रक्रियेत एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे.

इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल अॅपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, यात कोणती सावधगिरी बाळगावी, त्यावरील उपाय, सावधानता आदींबाबत महाराष्ट्र सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते परंतु लोक सतत फसतच असतात. जिथे पैसा, तिथे धोका हे तत्त्व सायबर गुन्ह्यांमध्येही दिसून येते. ई-शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल अॅपमधून होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठ्या प्रमाणात पैसे हडप केले जातात. त्यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
बँकेमधून फोन आल्याचे भासवणाऱ्या भामट्याकडे आपल्या खात्याचा बऱ्यापैकी तपशील असतो. बँकांकडून पुरविल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो. वेगवेगळ्या ऑफर वगैरेच्या नावाखाली मोबाइल क्रमांक घेतले जातात. यातून मोबाइलचा डेटा मोठ्या प्रमाणात जमा होऊन त्याची विक्री होते. म्हणूनच वेगवेगळ्या कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात.

source


मोबाइलवर कॉल करून लॉटरी तत्सम बक्षिसांचे अामिष दाखवून हजारो रुपयांनी गंडा घालण्याचे प्रकार सध्या जोरात सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पीननंबर, ओटीपी नंबरची मागणी करत लाखोंची फसवणूक केली जात असल्याचे प्रकारदेखील समाेर अाले अाहेत. मात्र, पोलिस यंत्रणा याकडे तक्रार येत नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधून असे रॅकेट चालविले जात असल्याचा संशय व्यक्त होताे अाहे. ऑनलाइनद्वारे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे पुढे अाले अाहे. 
आपल्या अधिकृत मेलवर भारतीय रिझर्व्ह बँक या नावाने एगादा मेल येतो. कोट्यावधी रुपयांची लकी ड्राॅ लागल्याचे सांगितले जाते. तसेच पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी एखाद्या बनावट इ-मेलवर नाव, पत्ता, वय, ई-मेल आयडी, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, खातेधारकांचे नाव, बँक ब्रांच, तुम्ही जिंकलेले पैसे, तुम्ही अगोदर किती पैसे भरू शकता अशाप्रकारे माहिती देण्याचे त्यात सांगण्यात येते. अनेकजण अशा मेलला उत्तरे देतात, अापली सगळी माहिती पलिकडच्या व्यक्तीला सांगतात अाणि फसतात. 
आम्ही सिटी बँकेमधून बोलतोय, लोनची गरज आहे का?’ अशा प्रकारचे फोन दिवसभरात अनेकजणांना फोन येतात. यात महिला आणि पुरुष दोघांचेच आवाज असतात. लोन पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मिळकत किंवा कागदपत्रे देण्याची गरज नाही असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी केवळ २५ ते ३० हजारांची पाॅलिसी काढावी लागेल. त्यासाठी अाम्ही सांगताे त्या खात्यात पैसे टाकावे लागतील, असेही या दूरध्वनीवर सांगण्यात येते. ते भामटे आवश्यक ती माहिती काढून घेतात आणि तुमच्या खात्यातले पैसेही काढून घेतात.

ओएलएक्‍स वेबसाइटवर सेकंड हॅण्ड चारचाकी गाड्या, बुलेट्‌स, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि अन्य गॅझेट्‌स कमी किंमतीत विक्रीला उपलब्ध असल्याची जाहिरात आधी टाकली जाते. ‘गूगल पे चा क्‍यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवा’, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित ग्राहकाच्या व्हॉट्‌सॲप नंबरवर डिलिव्हरीचे अपडेट पाठवले जातात. प्रत्येकवेळी पैशांची मागणी केली जाते. मात्र, मागवलेली वस्तू काही ग्राहकांना मिळत नाही.
गूगल सर्चमधील सेवा पुरवठादारांच्या ग्राहक सेवा केंद्राच्या ठिकाणी स्वत:चे भ्रमणध्वनी क्रमांक देण्यास या चोरटय़ांनी सुरुवात केली. एखाद्या ग्राहकाने संपर्क साधल्यास त्याचे बँक तपशील, डेबिट-क्रेडिट कार्ड तपशील घेऊन किंवा एनी डेस्क, टीम व्यूव्हरसारखे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्या भ्रमणध्वनीचा ताबा स्वत:कडे घेऊन आर्थिक फसवणुकीचे सत्र सुरू केले. देशभर अशा पद्धतीने असंख्य गुन्हे घडले आहेत.

इंटरनेटवरील विविध संकेतस्थळावर तसेच व्हाटसअ‍ॅप व फेसबुकवर ब्रॅण्डेड वस्तू स्वस्तात खरेदी करता येत असल्याच्या

इंटरनेटवरील विविध संकेतस्थळावर तसेच व्हाटसअ‍ॅप व फेसबुकवर ब्रॅण्डेड वस्तू स्वस्तात खरेदी करता येत असल्याच्या फर्स दिल्या जातात़ या आॅफरवर क्लिक केल्यानंतर आॅर्डर बुक केली जाते़ त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागते़ हे पेमेंट अदा करताना सदर साईटवर आपला एटीएम कार्डवरील क्रमांक व ओटीपी टाकावा लागतो़ हा ओटीपी सायबर गुन्हेगार नोट करून घेतात़ त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून गुन्हेगार त्यांच्या वॉलेटवर रक्कम वर्ग करून घेतात.

फर्स दिल्या जातात़ या आॅफरवर क्लिक केल्यानंतर आॅर्डर बुक केली जाते़ त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावे लागते़ हे पेमेंट अदा करताना सदर साईटवर आपला एटीएम कार्डवरील क्रमांक व ओटीपी टाकावा लागतो़ हा ओटीपी सायबर गुन्हेगार नोट करून घेतात़ त्यानंतर ग्राहकाच्या बँक खात्यातून गुन्हेगार त्यांच्या वॉलेटवर रक्कम वर्ग करून घेतात.

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असला तरी बहुतांशी गुन्ह्यांत ग्राहकांकडून भलत्याच व्यक्तीला ओटीपी, पिन नंबर दिल्यानंतर यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे, पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी केली जाते. यास बहुतांशी ग्राहक फसतात. सर्व बँक डिटेल देतात. दोन दिवसांत या ग्राहकांच्या बँक खात्यातून ऑनलाइन रक्कम काढली जाते. सायबर क्राइम हा पारंपरिक गुन्ह्याप्रमाणेच असतो. फक्त तो सायबर स्पेसमध्ये अर्थात इलेक्ट्राॅनिक काॅम्प्युटरच्या मदतीने केलेला असल्याने त्याला सायबर क्राइम म्हणतात. थोडक्यात काॅम्प्युटर क्षेत्रामध्ये केलेल्या गुन्ह्यांना सायबर क्राइम किंवा सायबर गुन्हा असे म्हटले जाते. 

source

लॉकडाउन असल्यामुळे घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग किंवा फूड्‌स डिलिव्हरी करण्यावर नागरिकांचा भर आहे. त्यामुळे अनेकांनी मोबाईलमध्ये पेमेंट ॲप्स डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी यांचाच लाभ उठवित ऑनलाइन गंडा घालणे सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांत ऑनलाइन फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इंटरनेटवरून घरबसल्या वस्तू बोलावणे, ड्रेस, घरगुती सामान आणि फूड मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच कुणाला पैसे पाठवणे किंवा बिल चुकते करणे, मोबाईल बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज यासह किराणा दुकानातील सामान विकत घेण्यापर्यंत आता मोबाईलवरून पेमेंट केल्या जात आहे. स्मार्टफोनमध्ये पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यासह अन्य ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर डिजिटल व्यवहार सोपे झाले आहे. मात्र, याच संधीचा लाभ सायबर गुन्हेगारांनी उचलला आहे. गेल्या काही महिन्यात ऑनलाइन फसवणुकीत वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून लाखो रूपये परस्पर काढून घेत आहेत. बॅंकेतून बोलतो, पेटीएमची केवायसी करून देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे असे अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरून नागरिकांना जाळ्यात ओढतात.

महागडे स्मार्ट फोन वापरराणाऱ्यांना सायबर गुन्हेगार गंडवित आहेत. फसगत होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे. पोलिसांनी फेक मॅसेज किंवा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही उच्चशिक्षित पुरुष व महिलांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्याची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेत तक्रारी नोंदविली जाते. मात्र, या तक्रारींचे पुढे काय होते. याची माहिती तक्रारदारांना दिलीच जात नसल्याची काही तक्रारी डी. बी. स्टारकडे आली आहे.  
बँकेतून बोलतोय, एटीएम कार्ड ब्लॉक झाले, बँकेकडून पडताळणी सुरू आहे’, असे सांगून पिन नंबर, ओटीपी नंबरची मागणी करत लाखोंची फसवणूक करण्याचा ऑनलाइन गोरखधंदा सध्या तेजीत असल्याचे प्रकार डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आले आहे. त्याचबरोबर‘तुम्ही कोट्यवधी रुपये जिंकला आहात’ असा एसएमएस इ-मेल पाठवून त्याच्या कागदपत्रांसाठी आठ-दहा हजार रुपये तत्काळ आमच्या खात्यात भरा, अशा मेसेजद्वारे फसवणुकीचा नवा फंडा भामट्यांच्या टोळीने सुरू केला आहे. नागरिक त्याला भुलतात अाणि फसवणूक हाेते. याबाबत तक्रार करण्यासाठी फारसे काेणी पुढे मात्र येत नाहीत असे चित्र अाहे. 
हे प्रकार कमी व्हावे याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत.सायबर सेलतर्फे शाळा-महाविद्यालयांत, कंपनीत नागरिकांच्या कमिट्या तयार केल्या आहेत. अनेकांच्या मेलवर अारबीअायच्या नावाने जे मेल येतात अशा मेलकडे नागरिकांने दुर्लक्ष करावे. आजच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्हबँक परिपत्रकानुसार ग्राहकाची चूक नसल्यास त्याला पैसे परत देण्याची जबाबदारी संबंधित बँकेची अाहे. यासाठी बँकेत ग्राहकाकडून ‘डिस्प्यूट’ फॉर्म भरून घेतला जातो. पोलिसांचा अभिप्राय घेत बँक ग्राहकाची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करते.

गुगल पे, गुगल सर्च, गूगल मॅप्स किंवा अन्य तत्सम व्यासपीठांद्वारे ऑनलाइन सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सायबर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. दैनंदिन आयुष्यात अशा सेवा वापरून आवश्यक ती माहिती किंवा संपर्क क्रमांक मिळवणाऱ्या ग्राहकांनी या यादीतील भ्रमणध्वनी क्रमांकांची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहेत. ‘घरबसल्या कमवा एवढे पैसे’ आशा फोन न होते फसवणूक लॉटरी जिंकली, बॅंकेतून बोलतोय, पेटीएम केवायसी आणि एटीएम ब्लॉक झाले, यासंदर्भात कुणी फोन केल्यास त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. तो सायबर गुन्हेगार असू शकतो. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलमध्ये तक्रार करावी. असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, इमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ज्ञ, पोलिस यंत्रणा ही सूचना करत असतात. परंतु बँकेतून कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामट्यांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा अॅपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. गुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्ययावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातन इमेल, अॅप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळ्यात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे.

 बनावट फोन कॉल करून एटीएम व बँक खात्याची माहिती विचारून खात्यातून  ऑनलाइन रक्कम परस्पर लांबवण्याचे प्रकार घडतात. अशी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, २४ तासांच्या आत एटीएम ब्लॉक करून पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास सायबर सेलच्या मदतीने खातेदारास त्याची रक्कम परत मिळू शकते. काही प्रकरणांत असे घडले आहे.  

बँक खात्यातून फसवणूक करून परस्पर लांबवलेली रक्कम पुन्हा रिफंड झाली आहे. हे पैसे परत मिळवून देण्यात पोलिसांच्या सायबर सेल व सायबर तज्ज्ञांचे मोठे साह्य मिळत असते. एखाद्या व्यक्तीची अशी फसवणूक झाल्यास त्याने २४ तासांत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजे. यामुळे २४ तासांत रक्कम तुमच्या खात्यात परत मिळवून देण्यास सायबर सेलला अवधी मिळतो. कारण २४ तासांपर्यंत रक्कम बँकेच्या जवळ (गेट वे) असते. माहिती मिळताच योग्य वेळी ही फसवणूक निदर्शनास अाणून दिल्यास रक्कम परत मिळते. शिवाय फसवणूक करणाऱ्यांची माहिती समजू शकते. हे तांत्रिक साह्य फक्त ऑनलाइन फसवणूक प्रकरणांत मिळू शकते. राेख रक्कम काढली असल्याच्या प्रकरणात याचा फायदा मिळत नाही.  काही प्रकरणांचा निपटारा होऊ शकत नसल्यास सायबर एक्स्पर्टचा सल्ला घेतला जातो. त्यानंतर सायबर सेलचे पथक संबंधित प्रकरणावर तपास करून तोडगा शोधून काढते.  

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ दक्ष राहून बँक व पोलिसांना कळविले पाहिजे. सायबर एक्स्पर्ट श्याम चंदेल यांनी सांगितले, कोणाही व्यक्तीसोबत सायबर क्राइम घडल्यास त्याने प्रथम बँकेत जाऊन एटीएम ब्लॉक करावे. बँक स्टेटमेंट काढून पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. त्यानंतर तक्रारीची फोटोकॉपी, ओळखपत्र व एक फोटो दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने तुमच्या खात्यात पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, तक्रार लवकर दाखल करावी लागते.  कोणाशीही ओटीपी शेअर करू नका. एटीएम कार्डाची माहिती कोणालाही देऊ नका. बँक फोनवरून संदिग्ध माहिती विचारत नाही. अशी माहिती सायबर पोलीस विभागाकडून आणि बँकांकडूनही दिली जाते. 
 ऑनलाईन फसवणूकीवर तोडगा म्हणून सायबर पोलीस ठाण्याने बँक, बिल भरणा केंद्र, ई- कॉमर्स संकेतस्थळे, केक शॉप, वाइन शॉप या आणि अन्य शासकीय, खासगी आस्थापनांच्या गूगलवरील तपशील पडताळून चोरटय़ांचे भ्रमणध्वनी क्रमांक शोधले. त्याची यादी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर हेडलाइन्स/ लिस्ट ऑफ ऑनलाइन फ्रॉड येथे जाहीर केली आहे. गूगलद्वारे यादीतील आवश्यक संपर्क क्रमांक शोधताना किंवा सेवा पुरवठादारांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्यापूर्वी यादीतील चोरटय़ांचे भ्रमणध्वनी क्रमांक पडताळावेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत स्वत:च्या डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा बँकेचा तपशील कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याने केले आहे. मुंबईकरांना उत्तर भारतातून लक्ष्य करणे, उत्तर भारतातील लोकांना मुंबईत बसून फसविणे असे प्रकार घडतात. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोबाइलची मदत होते. मात्र पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेल्या सिमकार्डचा वापर केला जातो. सीमकार्ड ज्याच्या नावे आहे त्याच्यापर्यंत पोलिस पोहोचतात. मात्र गुन्ह्यात त्याचा काहीच सहभाग नसतो. 

          ऑनलाइनवरून फसवणूक करून आलेली रक्कम बँकेत वळती करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीस सोबत घेतले जाते. त्याच्या नावावर रक्कम वळती करून त्यास कमिशनपोटी काही रक्कम दिली जाते. या बँक खातेदारांपर्यंत पोलिस पोहोचतात परंतु सूत्रधार वेगळाच असतो. बँक खातेदारांची आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या मुंंबईसह बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ सायबर गुन्ह्याचे कॉलसेंटर चालविणाऱ्या बहुतांशी टोळ्यांनी बँक ग्राहकांचा डेटा मिळविलेला आहे. बँक खातेदाराला फोन केल्यानंतर समोरील व्यक्ती प्रथम त्याच्या संबंधी सर्व माहिती त्याला देते़ अगदी खाते क्रमांकही सांगितला जातो़ त्यामुळे बहुतांशी जणांचा यावर विश्वास बसून हा कॉल बँकेमधून आला आहे असा समज होतो़ तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावयाचे आहे़ एटीएम कार्ड अपडेटस् करावयाचे आहे, तुम्हाला लोन मंजूर झाले आदी कारणे सांगून सदर ग्राहकांकडून त्याचा एटीएम क्रमांक, ओटीपी विचारून घेतला जातो़
लॉटरी लागल्याचा अचानक येणारा इमेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम आदी मोहाच्या सापळ्यात शेकडो जण अडकतात. अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येते. पैशाची आॅनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार बँक ग्राहकांना फोन करून वेगवेगळी कारणे सांगतात़ यामध्ये बँकेकडून येणारा ओटीपी व एटीएम कार्डवरील नंबर मिळवून पैशांची फसवणूक केली जाते़ ग्राहकांनी अशा कोणत्याही फोन कॉल्सला बळी पडू नये़ तसेच आॅनलाईन खरेदी करताना संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासूनच व्यवहार करावा

ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलवरून ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठाऊक नसतात. भामटे त्याचाच फायदा उठवितात. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत जाणे अडचणीचे होते. बऱ्याचदा एकटेदुकटे ज्येष्ठ नागरिक ई-व्यवहारात फसविले जातात. ई-साक्षरतेचा अभाव घातक ठरू शकतो. त्या अज्ञानामुळे हे भामटे तुमच्या आयुष्यभराची पुंजी पळवू शकतात.

ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातून केल्या जाणाऱ्या घोटाळ्याचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाइन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते. केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लाइव्ह लोकेशन, खासगी माहिती, फोटो शेअर करू नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन मॉर्फिंग आदी स्वरूपात महिलांना लक्ष्य करू शकतात. या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. 

सोशल मिडीयाच्या वापरामुळे मोबाईल मधील टेक्‍स्ट मेसेज पाहण्याची सवय मोडली आहे. मात्र बॅंक व इतर व्यवहाराची माहिती टेक्‍स्ट मेसेजद्वारे येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. वेळेत मेसेज पाहिल्यास होणारी फसवणूक काही प्रमाणात टाळता येऊ शकते. 

आजच्या युगात इंटरनेट मानवाचा अविभाज्य घटकच बनला आहे. इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगली, तर सायबर गुन्हे टाळण्यास मोठी मदत मिळू शकते. सायबर गुन्हेगार नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात. त्यात सामान्य नागरिक बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान होते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक झाली असून त्या अनुषंगाने शासनातर्फे राज्यभरात ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गंत कार्यक्रम राबविले जात आहे.  सायबर गुन्ह्यातील फिशींग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणे, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख चोरी, बँकविषयक फसवणूक, एटीएमविषयक फसवणूक, विमा विषयक फसवणूक, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे, आॅनलाईन खरेदीतील फसवणूक अशा आदी गुन्ह्यांवर पांडे यांनी प्रकाश टाकत त्यावर उपाय सुचविले. या गुन्ह्यांविषयक थोडीसी माहिती इंटरनेटचा वापर करणाऱ्यास असल्यास हे गुन्हे टाळले जाऊ शकतात, असे मत कांचन पांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. तसेच सायबर गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हे करतात. त्यानुसार इंटरनेट हाताळताना नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, यावर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसार माध्यमांना जनजागृती केली पाहिजे.

Gangadhar DHAVALE
Gangadhar DHAVALE

गंगाधर ढवळे ,नांदेड 

संपादकीय     /   २९.०८.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *