फुलवळ मध्ये पुन्हा आढळले चार नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.


फुलवळ बातमीदार ( धोंडीबा बोरगावे )


         कंधार तालुक्यातील फुलवळ येथे गेल्या जुलै महिन्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण होऊन ग्रामस्थ कोरोना च्या धास्तीने भयभीत झाले होते. तर आता पुन्हा नव्याने आणखी चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने गावकऱ्यांत भययुक्त वातावरण निर्माण झाले असून या चार रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.


         फुलवळ मध्ये पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला तेंव्हा मात्र गावभर लोक धास्तीने भयभीत होऊन गेले होते . भीतीपोटी काही प्रमाणात का होईना नियमांचे पालन करत मास्क , सॅनिटायझर चा वापर करायला सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू गावातील कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे जवळपास १८ ते २० रुग्ण आढळून आले आणि कंधार तालुक्यात एकाच गावातून सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेलं गाव म्हणून फुलवळ ची सर्वदूर ओळख झाली. 


           त्यानंतर आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रनेणे फुलवळ हे गाव कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करून येथील बंदोबस्तात वाढ केली. त्यावेळी फुलवळकराकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टिकोन पारच बदलून गेला होता. परंतु वेळीच गावकऱ्यांनी जागरूकता दाखवत प्रशासन आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत त्यांच्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य केले आणि त्यातल्यात्यात ग्रामपंचायत ने केलेले शर्थीचे प्रयत्न , गावकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद व जागरूक नागरिकांनी वेळोवेळी भयमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि अवघ्या काही दिवसातच गाव कोरोना मुक्त करण्यात यशस्वी झाले.


        त्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी उलटत असताना पुन्हा दोन दिवसांपूर्वी येथे दोन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पुन्हा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत च्या वतीने सतर्कता दाखवत तो एरिया सील करण्यात आला आणि आज त्या दोघांच्या संपर्कातील अन्य नऊ जणांची तपासणी आरोग्य विभागाने केली असता त्यातले पुन्हा दोन जनांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आणि सोबतच या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली तपासणी करून घ्यावी जेणेकरून वेळीच सावधानता बाळगता येईन असे आवाहन ही आरोग्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *