सहकारी पतसंस्था संचालक व कर्मचाऱ्यांचे कंधार येथे प्रशिक्षण

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादीत पूणे यांच्या अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे वतीने आयोजित कंधार येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे आज २७ डिसेंबर रोजी कंधार तालुक्यातील नागरी पगारदार सेवक सहकारी पतसंस्था संचालक कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले .

विना सहकार नाही उध्दार हे ब्रिद घेऊन सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे वतीने कंधार येथे दि.२७ व २८ डिसेंबर या दोन दिवसांत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले .

यामध्ये सहकार कायदा नियामक मंडळी उपविधी दुरुस्ती, योग्य कर्ज वाटप , वसूली तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये बैठकीत पतसंस्था सभासद कर्मचारी व पदाधिकार्यांना  विविध बदलले नियम , सभासद क्रियाशीलता , संस्था निवडणूक आदी बाबत
यावेळी सहकार अधिकारी श्रेणी अ सहकारी संस्था कंधारचे ए .के कोकणे  , सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर चे प्रा एस आर कोळ्ळे यांनी मार्गदर्शन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *